Sexual Relationship and Lock Down

6,055

कोरोनामुळे लॉक डाऊनचे आपल्याकडे ४०दिवस होत आलेत. अनेक ताण तणावाचे प्रसंग आपल्या घरात घडताना आपण अनुभवत आहोत. बाहेर जाता न येणं, घरातली कामं करावी लागणं, वेळ जात नसल्यामुळे आलेला कंटाळा, बाहेरच्या परिस्थितीचा ताण या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपली चिडचिड होण्याची शक्यता जास्त आहेच की. याव्यायतिरिक्त घरात सगळे लोक असल्याने लैंगिक संबंध प्रस्थापित करणं सुद्धा कठीण होऊन बसत आहे. तर काही घरात नवऱ्याकडून सतत लैंगिक संबंधांच्या मागणीला वैतागलेल्या महिलांच्या बातम्या सुद्धा येत आहेत.

काळजीवाहू लोकांनी म्हणे बाजारातले निरोध संपवत आणलेत, चांगली गोष्ट आहे! काही लोकांची लग्न रखडली तर काही लोक लग्न करूनही आपआपल्या घरी रहात असल्याने मधू इथे अन चंद्र तिथे अशी अवस्था आहे. प्रेमी युगुलांचे तर फारच कठीण झालंय, घरात सगळ्यांच्या मध्ये बोलता येत नाही अन अशा जागा मिळणं कठीण झालंय पण इंटरनेटमुळे थोडंतरी सुसह्य झालंय बाकी सब ठीक आहे.

तुमचा काय अनुभव आहे? आम्हाला नक्की लिहा. अन तुम्हाला माहिती आहेच की तुमची ओळख कुठेही उघड होणार नाही.

 

 

Comments are closed.