लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही

2 4,069
 • आपण सगळे लैंगिक आहोत. लैंगिक क्रिया करत असलो किंवा नसलो तरीही आपण लैंगिक आहोत.
 • लैंगिक असणं म्हणजे केवळ लैंगिक क्रिया करणं नाही. यात आपल्या भावना, विचार, दृष्टीकोण यांचाही समावेश होतो.
 • एकमेकांचा आदर आणि संमती, एकमेकांना व स्वतःला सुखकर आणि सुरक्षित असतील असे लैंगिक संबंध आणि व्यवहार आपल्या निकोप वाढीसाठी उपयोगी ठरतात.
 • हिंसा आहे, अनादर आहे, जे लैंगिक व्यवहार आपली प्रतिष्ठा राखत नाहीत त्यांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो. असे अनुभव आपल्या आत्मविश्वासावर आणि आपल्या मनातल्या आपल्या प्रतिमेवर खोल परिणाम करतात.
 • लैंगिक सुख अनेक प्रकारे व्यक्त केलं जाऊ शकतं. शारीरिक आणि भावनिक पातळीवर अनेक प्रकारच्या कृतींचा यात समावेश होतो.
 • समाज लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. खास करून स्त्रियांच्या लैंगिकतेवर कडक नियंत्रण ठेवलं जातं. यासाठी प्रचलित चाली रीती आणि कायद्यांचाही वापर केला जातो.
 • लैंगिकतेचा विचार बहुतेक वेळा केवळ पुरुषांच्या नजरेतून केला गेला आहे. पुरुषांचे अनुभव, गरजांप्रमाणे स्त्रियांच्या गरजांचा, विचार केला गेलेला नाही. उलट स्त्रियांच्या भावना, गर, जा नाकारल्या गेल्या आहेत. आणि बहुतेक वेळा या गरजांना कमी लेखलं गेलं आहे.
 • अनेकदा असं दिसून आलं आहे की लैंगिकतेचा पहिलाच अनुभव हिंसक असेल किंवा जबरदस्तीचा असेल तर बहुतेक व्यक्तींच्या मनात लैंगिकतेबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना तयार होते.

 

2 Comments
 1. Harsh says

  लग्नाला 5 वर्ष झाले , डॉक्टर ची ट्रीटमेंट सुरू आहे, बाळा साठी, पण वाद विवाद झाला की, आम्ही संभध तेवत नाही , उपाय सांगा

  1. let's talk sexuality says

   तुमची बाळासाठी ट्रीटमेंट सुरू आहे त्यासाठी काय काय करावे लागेल हे तुमच्या डॉक्टरांनी सांगितले असेलच. त्याचे पालन करा. राहिला प्रश्न वाद विवादांनंतर असं होणं सहाजिक आहे. पण तुम्ही वाद विवाद का होत आहेत ती कारणं शोधणं गरजेचं आहे व त्यावर काम करावं लागेल. एकमेकांशी बोलुन/ठरवून हे टाळता येते आहे का पहा.
   जर कुणाची मदत हवी असल्यास आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. येथे पुढिल नंबर वर बोलु शकता. ९५६१७४४८८३ इथे तुमचं म्हणणं ऐकुन घेतील. गरज असल्यास काही सेवा-सुविधांशी जोडून ही दिलं जाईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. या नंबर वर व्हाट्सअप वर मेसेज करुन तुमची वेळ ठरवा अन मोकळेपणाने बोला.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.