लैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार

लैंगिक संबंधातून पसरणारे आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुसंसर्गातून पसरतात. जंतू तीन प्रकारचे असतात. जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) आणि परजीवी (पॅरासाइट).
  •  जीवाणूंमुळे होणारे संसर्ग – क्लॅमेडिया, गनोरिया, सिफिलिस
  • विषाणूंमुळे होणारे संसर्ग – जननेंद्रियांवरील मस किंवा चामखीळ (वॉर्ट) – एचपीव्ही, जननेंद्रियांवरील नागीण (जनायटल हर्पिस), ब व क प्रकारची कावीळ, एचआयव्ही/एड्स
  • परजीवींमुळे होणारे संसर्ग – ट्रिक, जांघेतील उवा, खरूज

याशिवाय बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस आणि कॅण्डिडा या जंतुलागणींमुळे लिंगसांसर्गिक आजारांचा धोका जास्त वाढतो.

(वरील सर्व संसर्गाच्या सविस्तर लिंक लेखाच्या खाली दिलेल्या आहेत.)

स्त्रियांमधली काही सर्वसामान्य लक्षणं
  • लघवी करताना वेदना
  • लैंगिक संबंधांच्या वेळी दुखणं
  • दोन पाळीच्या मध्ये रक्तस्राव, लैंगिक संबंधांच्या वेळी रक्तस्राव
  • योनीस्रावाचा रंग बदलणं – पिवळा, हिरवट किंवा लाल रक्तस्राव
  • योनीस्रावाला उग्र व घाण वास
  • मायांगामध्ये खाज – गुदद्वारातून स्राव
  • जननेंद्रियांवर किंवा गुदद्वारावर फोड, पुळ्या, गाठी, व्रण
  • ओटीपोटात दुखणं
पुरुषांमधली काही सर्वसामान्य लक्षणं
  • लघवीच्या वेळी किंवा लैंगिक संबंधांच्या वेळी वेदना
  • लिंगातून किंवा गुदद्वारातून पूसारखा स्राव
  • जननेंद्रियांवर किंवा गुदद्वारावर फोड, पुळ्या, गाठी, व्रण
  • जांघेमध्ये गाठी येणे, त्या फुटणे किंवा चिघळणे
  • एका किंवा दोन्ही वृषणांमध्ये वेदना
लक्षात ठेवा
  • न घाबरता आणि लाजता डॉक्टरांची किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
  • इतर आजारांसारखेच हे देखील आजार आहेत आणि त्यांच्यावर उपचारदेखील आहेत.
  • वेळीच निदान झालं तर बहुतेक लिंगसांसर्गिक आजार बरे होऊ शकतात.
  • वेळीच उपचार झाले नाही तर मात्र काही आजारांचं घातक रोगांमध्ये रुपांतर होऊ शकतं.
अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा 

एच आय व्ही – एड्स

जननेंद्रियांवरची नागीण : जनायटल हर्पिस

परमा : गोनोरिया

मृदू व्रण (शांक्रॉईड)

गरमी : सिफिलिस

‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B

जननेंद्रियांवरील चामखीळ/मस : जनायटल वार्टस

योनीमार्गात जंतुसंसर्ग का होतो?

योनीमार्गाचे काही आजार

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

6 Responses

  1. Anonymous says:

    लिंगातून पूसारखा स्राव
    जननेंद्रियांवर किंवा फोड, पुळ्या
    मला झाल आहे काय करायला पाहिजे.

    • I सोच says:

      ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

  2. रूची says:

    मला माझ्या योनी तुन घट वॉईट रंगा चे विर्य जात आहे तर मी काय करावे

    • I सोच says:

      बर्‍याच गोष्टीचे निरिक्षणातून अचूक निदान होते, सोबत काही लिंक दिल्या आहेत त्यावरुन तुम्ही माहिती घ्या, स्वत: निरिक्षण करा https://letstalksexuality.com/white-discharge/
      अन जर नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराच लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत, त्वरीत डॉक्टरांना भेटा.
      पुढच्या वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर प्रश्न विचारा

  3. Aniket says:

    माझ्या लिंगाच्या चमड़ी वर सुज आली आहे

    • I सोच says:

      आपल्या समस्येचे निदान हे पाहूनच करावे लागणार आहे त्यासाठी आपल्याला तज्ञ डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे.

      पुढील वेळेस इथे प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ इथे प्रश्न विचारावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap