तरुणांच्या आत्महत्या

823

भारताचा विचार करता, 15-29 वर्षांच्या मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे प्रमुख कारण म्हणुन पुढे आले आहे. आपल्या देशामध्ये दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. अशा आत्महत्यांंना प्रतिबंध कसा करता येईल याचा विचार करावा लागेल, काही लेखाच्या लिंक बातम्यांच्या खाली दिल्या आहेत, नक्की वाचा.

प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

अमरावती –  नजीकच्या गोरेगाव येथील वीरेंद्र राजूलाल आहाके (२२) आणि अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

वरूड तालुक्यातील गोरेगाव येथील या युगुलाचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या आंतरजातीय प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध असल्याने शनिवार २३ जूनला रात्री ९.३० च्या सुमारास ते घरून पळून गेले. त्यांनी लग्न करण्याचा कायदेशीर प्रयत्न केला. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने ते यशस्वी होऊ शकले नाही. अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. वीरेंद्र याने रविवारी रात्री घरी फोन करून ‘हा माझा शेवटचा फोन’ असल्याचे सांगितल्याने रात्रीपासूनच शोधाशोध सुरू केल्याची चर्चा होती.

बातमीचा दूवा : http://www.lokmat.com/amravati/inter-caste-couple-commits-suicide-near-amravati/

प्राध्यापकाच्या त्रासामुळे पवईत ‘टिस’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई : इंजिनीअरिंग चांगले नसून त्यात नोकऱ्या नाहीत, तू शिक्षण घेऊ नकोस, अशा स्वरूपाच्या प्राध्यापकाच्या टिप्पणीला कंटाळून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पवईत घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटनुसार, पवई पोलिसांनी प्राध्यापक पी. विजयकुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संकेत हा पवईच्या रामबाग इमारतीत कुटुंबीयांसोबत राहायचा. त्याची आई डॉक्टर तर वडील दंडाधिकारी आहेत. २०१५ मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण करून त्याने एलएलबीचा अभ्यास सुरू केला. जून महिन्यात त्याने टिसमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. याच दरम्यान प्राध्यापक विजयकुमार त्याला त्रास देत असल्याचे त्याने पालकांना सांगितले. यामुळे मुलगा तणावात असल्याने त्यांनी त्याच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून उपचारही सुरू केले होते. याच दरम्यान पालकांनी संस्थेकडे ३० आॅक्टोबर रोजी विजयकुमारविरुद्ध लेखी तक्रार केली. त्यानंतर संकेतने घरूनच अभ्यास सुरू केला.

बातमीचा दूवा : http://www.lokmat.com/mumbai/powais-tis-student-suicides-due-professors-troubles/

धक्कादायक! बालगृहात अल्पवयीन मुलाची आत्महत्या

मुंबई – १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने छताला दोरी बांधून आत्महत्याकेल्याची घटना मानखुर्द येथील बालगृहाच्या परिसरात सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला असून आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.
मानखुर्दच्या आगरवाडी येथे चिल्ड्रेन्स एड सोसायटीअंतर्गत असलेले बाल कल्याण नगरी हे बालगृह आहे. या बालगृहामधील नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा अल्पवयीन मुलगा पुण्याचा असून नेपाळी समाजाचा होता. या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आईला या मुलाला सांभाळता येत नसल्याने दोन वर्षांपूर्वी त्याला बालगृहात प्रवेश देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो हळव्या मन:स्थितीत असायचा असे समजते. तो राहत असलेल्या खोलीमधील इतर मुले सोमवारी सायंकाळी अभ्यासासाठी बाहेर गेली होती. बालसुधारगृहातील मुलांच्या झोपण्याच्या खोलीत कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेली दोरी त्याने राहत असलेल्या कुटीरमध्ये छताला बांधून आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्यासोबतची अभ्यासासाठी गेलेली मुले अभ्यास करून परतल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलांनी तत्काळ बालगृहातील कर्मचाऱ्यांना याविषयी सांगितले.

बातमीचा दूवा : http://www.lokmat.com/crime/shocking-younger-child-commits-suicide/

अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

सिडको : परिसरातील शुभम पार्कमध्ये राहणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (१८) याने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एफवायबीकॉम परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून पुढील तपास केला जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास विक्रांतने राहत्या घरातील छताच्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ खोलीचा दरवाजा तोडून विक्रांतला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. रूग्णालयात नेण्यापूर्वीच विक्रांतचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बातमीचा दूवा : http://www.lokmat.com/nashik/student-suicides-due-failure/

इतर काही दुवे :

कनेक्टिंग हेल्पलाईन

 

World Mental Health Day 2018

 

पुरुषाची मानसिक कोंडी कशी फुटेल ???

 

प्रेम आमच्या हक्काचं

Comments are closed.