सुरमई

- किरण येले

2,424

 

तुम्हाला सुरमई माहीत आहे का?

बरोब्बर

चवदार रसरशीत सुरमई कोणाला माहीत नाही?

पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल का?

अरे, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे.

तिची चमचमती त्वचा,

तिचं ताजेपण ओळखण्याची कला,

तिची महागलेली किंमत

सगळंच.

आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालहीः

तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते.

किंवा तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते,

किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.

पण माफ करा,

तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे

असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे.

तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही,

तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते

माहीत नाही,

आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर

तुम्हाला नक्कीच माहीत नाही!

एक सांगतो,

रागावू नकाः तुम्हाला खरं तर

सुरमईची चव माहीत आहे,

सुरमई नाही,

आणि जे सुरमईच्या बाबतीत

तेच

अगदी

तेच

बाईच्याही !!!

 

kiran.yele@gmail.com

स्त्री-पुरुष दोन्ही गटात उणीवा आहेत. पण या उणीवांची जाणीव बाळगून सहजीवन जगणं सहज शक्य आहे. सेक्ससारख्या नैसर्गिक संवेदनांचा व्यापार करू पाहणाऱ्याना दूर ठेवल तर हे शक्य आहे. त्यासाठी उभयतांना एकमेकांच्या शरीराचा परिचय असून पुरेसं नाही मनाचाही परिचय हवा. परस्परात खरंखुरं सामंजस्य हवं. स्त्रियांपाशी ते आहेच. गरज आहे ती पुरुषांनी लैंगिक जाणीवांपलीकडे जाऊन स्त्रीचं शरीरमन समजून घेण्याची. वरील कवितेत किरण येलेंनी पुरुषांमधली ही उणीव खूप मार्मिकपणे मांडली आहे

 

कवितेचा स्त्रोत : पुरुषस्पंदनं, माणूसपणाच्या वाटेवरची, दिवाळी अंक 2011, लैंगिक जाणिवा आणि उणिवा – लेखक अवधूत परळकर पान 21

प्रकाशक – Men Against Violence and Abuse (MAVA)

2 Comments
 1. prajakta says

  striyanjavla samnjasya upjatch asata ka?

  aani purushanjavl te nsata?

  1. lets talk sexuality says

   आपण मांडलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे बाईला समंजस बनवले जाते व पुरुषही समंजस असू शकतात. आपल्या मुद्द्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. सदर लेखात लेखकाचे विचार आहेत तसेच आम्ही मांडले आहेत. आम्ही यात नक्की बदल करु.
   आपण किती जाणीवपूर्वक लेख वाचत आहेत, हे पाहून छान वाटले. आपले असेच प्रेम वेबसाईटवर असू द्यावे. धन्यवाद.

Comments are closed.