१ मार्च: शून्य भेदभाव दिवस… सगळं नॉर्मल आहे…
आपण सगळे मानव आहोत. आपण सगळे एक आहोत तरी आपल्यातला प्रत्येक जण वेगळा आहे. माझा रंग काळा आहे पण माझी मैत्रीण गोरी आहे. मी जाड आहे तर माझा भाऊ लुकडा. काही जणांच्या शरीरात लिंग आणि वृषणं असतात तर काहींच्या शरीरात गर्भाशय आणि योनिमार्ग. काहींना…