लग्नानंतर चार महिन्यात शिक्षिकेची प्रसुती, शाळेकडून हकालपट्टी

लोकसत्ता ऑनलाइन

1,595

लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात शिक्षिकेची प्रसुती झाल्यामुळे शाळेने तिला नोकरीवरुन काढून टाकले आहे. केरळच्या कोट्टाक्कल येथील पूर्व प्राथमिक शाळेत ही शिक्षिका नोकरीला होती. प्रसुती रजा संपल्यानंतर शाळेचे प्रशासन आणि पालक-शिक्षक संघटना कामावर रुजू होऊ देत नसल्याबद्दल या शिक्षिकेने आता पोलिसात धाव घेतली आहे. पीटीएच्या बैठकीत पालक-शिक्षकांनी आपल्याला भरपूर अपशब्द सुनावले असा आरोप शिक्षिकेने केला आहे.

कोट्टाक्कल पोलीस या ३३ वर्षीय शिक्षिकेची जबानी नोंदवून घेणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ही शिक्षिका या शाळेत नोकरी करत आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन या शिक्षिकेने दुसरे लग्न केले आहे. पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाची प्रक्रिया लांबली होती. त्याच दरम्यान तिने कायदेशीर दुसरे लग्न करण्याआधी भावी पतीसोबत एकत्र रहायला सुरुवात केली. मागच्यावर्षी जून २०१८ मध्ये तिने दुसरे कायदेशीर लग्न केले. लग्नानंतर चार महिन्यांनी तिने प्रसुती रजेसाठी अर्ज केला.

प्रसुती रजेसाठी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने बाळाला जन्म दिला. जानेवारी २०१९ मध्ये प्रसुती रजेचा कालावधी संपल्यानंतर जेव्हा मी पुन्हा शाळेत रुजू होण्यासाठी आली. तेव्हा शाळेने लग्नानंतर चार महिन्यात प्रसुती रजेसाठी अर्ज केल्याचे कारण सांगून पुन्हा मला कामावर घेण्यास नकार दिला असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या शिक्षिकेने बाल हक्क आयोगाकडे अर्ज केला आहे.

बातमीचा स्त्रोत – https://www.loksatta.com/desh-videsh-news/teacher-gives-birth-four-months-after-marriage-school-expel-her-kerala-dmp-82-1914993/

शिक्षिकेसोबत शाळेने जे केले त्यावर तुमचं काय मत आहे? एका शिक्षकी पेशा असणाऱ्या व्यक्तीने लग्नाआधीकेलेले हेे कृत्य तुम्हाला मान्य आहे का? तसेच लग्नाआधी केले जाणारे संबंध तुम्हाला मान्य आहेत का? तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की लिहा.

Comments are closed.