तेव्हा एक कर…

1,757

जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन…

तेव्हा एक कर

तू नि:शंक मनाने डोळे पूस

ठीकच आहे; चार दिवस धपापेल,

जीव गदगदेल

उतू जाणारे हुंदके आवर… कढ आवर…

नवे हिरवे चुडे भर…

पण उगीच चिर वेदनेच्या नादी लागू नको

खुशाल, खुशाल तुला आवडेल असे

एक नवे घर कर

मला स्मरून कर, हवं तर विस्मरून कर!

– नारायण सुर्वे

संदर्भ – कुसुमाग्रज यांच्या ‘निवडक नारायण सुर्वे’ या संकलनातून साभार.

2 Comments
  1. Sadhana says

    very nice poem……………..

    1. I सोच says

      Thanks for your response…

Comments are closed.