स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता मिळाली आहे. सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक ञास आणि वेदाना गप्प बसून सहन कराव्या लागतात. बायकांनी या गप्प बसा संस्कृतीचा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे. याला छेद देऊन आज पुढे येण्याची गरज आहे.

स्ञियांवरील हिंसा म्हणजे काय?

नऊ वर्षाच्या नसरीनवर सामूहिक बलात्कार …
कॉलेजवरुन येताना चौकामध्ये मुलं ञास देतात म्हणून ११वीत शिकणार्या राधाने कॉलेज सोडले
प्रेमाला नकार देणार्या सुलभाच्या तोंडावर असिड फेकले
बायकोवरील संशयामुळे तिला घराबाहेर पडण्यास मनाई
आमटीत मीठ कमी पडले म्हणून बायकोला मारहाण
अशा अनेक घटना आपण ऐकतो, पाहतो, कधीकधी आपण स्वतः अनुभवलेला असतो. हे प्रमाण झपाट्याने वाढतही आहे. वरील घटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हिंसा दिसून येते. समाजात मारामारी केली किंवा रक्त पाहिलं तरच त्याला हिंसा म्हटले जाते. परंतु स्ञियांवरील हिंसा ही फक्ता मारहाणीपुरतीच मर्यादित नसून त्याचे शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक आणि इतरही प्रकार आहेत.

“इजा, मानसिक आघात, मृत्यू, अधोगती किंवा वंचनास कारणीभूत ठरणारा, स्वतःला किंवा दुसर्याला, गट किंवा समुदायाला इजा पोचवणारा बळाचा हेतुपूर्वक वापर किंवा तसा वापर करण्याची धमकी म्हणजे हिंसा होय.”

या व्याख्येप्रमाणे मारायची प्रत्यक्ष कृती जशी हिंसा आहे तसचं मारण्याची धमकी ही देखील हिंसाच आहे. कारण त्या धमकीमुळेही तोच परिणाम होऊ शकतो. या व्याख्येचा महत्वाचा पैलू म्हणजे बळाचा जाणीवपूर्वक वापर. जो हिंसा करतो त्याला आपण काय करत आहोत आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत याची पुरेपूर जाणीव असते. हिंसा चुकून होत नसते.

स्ञियांवरील हिंसा म्हणजे फक्ता मारहाण नाही.
मारहाण हे स्ञियांवरील हिंसेचं उघड रूप आहे, पण फक्त मारहाण म्हणजे हिंसा नाही. मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक, हीन वागणूक, लैंगिक छळ, जबरदस्तीने शारीरिक संबंध, छेडछाड ही देखील हिंसाच आहे. स्ञियांवरील हिंसेचा महत्वाचा पैलू म्हणजे सर्रास करण्यात येणारा भेदभाव. मुलगी म्हणून किंवा बाई म्हणून दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक, सर्वच बाबतीत केला जाणारा भेद, सतत नियंञण ठेवणं, निर्णय घेऊ न देणं, स्वातंञ्य नाकारणं ही देखील हिंसाच आहे.
कशाच बाबतीत मत न विचारणं, संमती व्यक्त करू न देणं, मताचा आदर न करणं हा स्ञियांसाठी खूप हिंसक अनुभव असतो. घरापासून ते गावापर्यंत सर्व कारभारापासून हेतुतः दूर ठेवणं, सामावून न घेणं ही न दिसणारी पण खूप मोठ्या प्रमाणावर स्ञियांनी अनुभवावी लागणारी हिंसाच आहे.

स्ञीवरील हिंसा ही एका घरातील, एका जातीतील किंवा एका धर्मातील पुरूषाची वागणूक इतकी मर्यादीत नाही. संपूर्ण जगभरात दर तीनपैकी एका तरी स्ञीने तिच्या आयुष्यात हिंसा अनुभवलेली आहे. नोंद न झालेल्या, पोलिस स्टेशनमध्ये न गेलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणखीनच मोठी असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसा होत असताना ती खाजगी बाब किंवा नवरा बायकोमधील भानगड समजण चुकीचं ठरेल.

हिंसेचे प्रकार
१. शारीरिक हिंसा
शारीरिक हिंसेमध्ये, दुसर्या व्यक्तीवर नियंञण ठेवण्यासाठी शारीरिक इजा किंवा धमकीचा वापर करणे. म्हणजेच कशाही वस्तूने अथवा हाताने मारहाण करणे किंवा चिमटा काढणे, थुंकणे, ओरबाडणे या सगळ्यांचा समावेश होतो.

२. मानसिक-भावनिक हिंसा
समोरच्या व्यक्तीवर सतत टीका करणे, चुका काढणे, अपमान करणे ही देखील हिंसाच आहे तसेच वाईट व हीन वागणूक देणे, त्या व्यक्तीला जास्तीत जास्त परावलंबी व दुय्यम असल्याची जाणीव करून देणे याला मानसिक किंवा भावनिक हिंसा म्हंटले जाते. आवडत्या वस्तूंचे नुकसान करणे, वारंवार शाब्दिक मार, अबोला धरणे, माहेरच्या लोकांबद्दल वाईट बोलणे, संशय घेणे आणि अविश्वास दाखवणे हे सगळं मानसिक किंवा भावनिक हिंसेमध्ये समाविष्ट आहे.

३. लैंगिक छळ
कोणत्याही प्रकारे शारीरिक बळाचा वापर करून किंवा न करता देखील स्ञीला तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध करावयास भाग पाडणे. म्हणजेच जबरदस्तीने संभोग, बलात्कार, छेडछाड, आई-बहिणीवरुन शिव्या, लैंगिक अवयवांना इजा तसेच इच्छेविरुद्ध शारीरिक स्पर्श, लग्न, लैंगिक भाषेचा वापर आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ यांचा समावेश होतो.

४. नियंञण किंवा बंधन घालणे
स्ञीला घराबाहेर काम करण्यास अडवणूक करणे, एकाकी पाडणे, सतत देखरेख ठेवणे, माहिती-पैसा-मालमत्ता-साधनसामुग्रीवर नियंञण ठेवणे, तिच्या पैशांचा वापर करणे, दागिने, पैसे चोरुन वापरणे आणि हुंड्यासाठी छळ करणे.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. योग्यता वझे says:

    Sido types जेंडर equlity मराठी काही सांगू शकाल का किंवा प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap