अमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ

Valentine's Day

0 1,156

व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेमी युगुलांच्या उत्साहाला उधाण येतं. आपलं प्रेम सेलिब्रेट करण्यासाठी यादिवशी एकमेकांसोबत वेळ घालवणं, प्रेमाच्या आणाभाका घेणं, यांसारख्या गोष्टी ठरलेल्याच. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपलं प्रेम आयुष्यभर टिकवण्याची, संकटकाळात एकमेकांना साथ देण्याची शपथ प्रेमवीर एकमेकांना देतात.  पण याच व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेयर सोसायटी द्वारा संचालित महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ दिली आहे.

या शपथेतील मजकूर पुढीलप्रमाणे –

“मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसंच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते.”

अशा प्रकारच्या शपथांंनी खरंच काही घडेल का? प्रेम ही भावना अशाने खरंच दडपून टाकली जाऊ शकेल का? हा मार्ग तुम्हाला पटतो का? जर हो तर का? अन जर नाही तर प्रेमाच्या किंवा  अशा प्रकारच्या  नात्यांबाबत काय व कशा प्रकारे बोललं गेलं पाहिजे? खाली कमेंट मध्ये नक्की लिहा.

पूर्ण बातमी वाचण्यासाठी बी बी सी मराठी वेब पोर्टल वरील पुढील लिंक पहा : https://www.bbc.com/marathi/india-51491988

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.