www.ViolenceNoMore.in 

स्त्रियांवरील हिंसेविषयी सर्वकाही....

1,269

तथापि ट्रस्ट निर्मित www.ViolenceNoMore.in  ही आणखी एक वेबसाईट जी स्त्रियांवरील हिंसेसारख्या संवेदनशील मुद्यावर माहिती देणारे एखादे ऑनलाईन संसाधन तयार करावे असा आमचा विचार होता त्याचाच हा परिपाक आहे. हिंसा सहन करणाऱ्या स्त्रिया, महिला संघटना, संस्था किंवा हिंसेच्या मुद्यावर हस्तक्षेप करणाऱ्या सर्व प्रकारच्या कामातील व्यक्तींना, यंत्रणांना ही वेबसाईट मदतीची ठरावी असा आमचा प्रयत्न असणार आहे.

www.ViolenceNoMore.in  स्त्री हिंसेच्या मुद्द्यासंबंधीची सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाइटचे उद्घाटन ३ जानेवारी २०१९ रोजी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून लोकांसमोर घेऊन आलोत. पुणे आणि राज्यातील निरनिराळ्या संस्था संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी मा. समिक्षा चंद्राकार उपस्थित होत्या.

पुणे जिल्ह्याच्या महिलांसाठीच्या स्थानिक तक्रार निवारण समितीचे गेले अनेक वर्षे अतिरिक्त काम पाहत असलेल्या समीक्षा चंद्राकार म्हणाल्या की, “एकीकडे स्त्रिया मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे दिसत असले तरी त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या हिंसेचे प्रमाणही तेवढेच वाढत आहे. विशेषतः ज्यांना सुशिक्षित म्हटले जाते अशा कार्पोरेट जगात तर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचे प्रमाण भीतीदायक आहे.”

हिंसेविरोधी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी सांगितले, “स्त्री वर पूर्वीही हिंसा होतच होती आणि आजही हिंसा होत आहे. त्यात आणखी भर म्हणजे इंटरनेट, सोशल मिडीयाचा गैरवापर करून मुली-स्त्रिया आणि लहान मुलांवरही हिंसा होताना दिसत आहे आणि त्याचे प्रमाणही वाढत आहे. ViolenceNoMore.in  सारख्या वेबसाइटचा उपयोग हिंसेचा सामना करणाऱ्या तरुण मुली आणि स्त्रियांना नक्कीच होऊ शकेल.”

 

स्त्रियांचे आरोग्य आणि हिंसेसारख्या मुद्द्यावरील बदलत्या काळातील ही आव्हानं त्याच बदलत्या काळाची माध्यमं वापरून कशी हाताळता येतील त्या दिशेने केला गेलेला तथापिचा हा प्रयत्न आहे!!

www.ViolenceNoMore.in 

Comments are closed.