आपण सारे एक समान

1,188

काही असे काही तसे, सगळे नाहीत जसेच्या तसे
कुणाचा आहे गोड गळा, कुणी गोरा, कुणी काळा
कुणी बोलतात खुणांनी, कुणी वाचतात स्पर्शांनी
कुणाला चालायला काठीची मदत,
कुणाला लाभते खुर्चीची सोबत.
कुणी गतिमंद, कुणी मतिमंद, तरी जपतो विविध छंद
तरी आम्ही सारे हुशार, येतात आम्हांला गोष्टी चिक्कार
समजून घ्याल आम्हांला, कळेल सगळं तुम्हांला
चला देऊ या घोषणा छान, आपण सारे एक समान

संदर्भ – ही कविता तथापिच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची … (प्रकाशन २०१४) या अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी प्रकाशित पुस्तकातून घेण्यात आली आहे.

चित्र साभारhttp://www.dreamstime.com/royalty-free-stock-photos-group-sick-kids-pediatrics-image4139808

Comments are closed.