सेक्स किंवा लैंगिक संबंध

13,826

दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध म्हणजे सेक्स. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये प्रवेश करणे. यासोबतच मुखमैथुन, गुदामैथुन हेही संभोगाचे इतर काही प्रकार आहेत.

तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जास्त जवळ जावंसं वाटत असतं किंवा जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झालेले असता तेव्हा तुम्ही सेक्स करता किंवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. सेक्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी.

विविध संस्कृतींमध्ये सेक्सविषयी, शरीर संबंधांविषयी काही लिखित अलिखित नियम असतात. सेक्सविषयी आपण मोकळेपणाने बोलू शकतो का नाही, त्या क्रियेबद्दल आपल्या मनात कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतात यावर आपल्या समाजातल्या नीतिनियमांचा परिणाम होत असतो. पण सेक्स करण्याची भावना ही अगदी आदिम भावना आहे आणि त्यात घाण असं काही नाही हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

5 Comments
 1. vinayak says

  अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  Sex विषयी अज्ञान ही भारतीय तरुणवर्गाची समस्या आहे
  यातुन अनेक गैरसमज व विकृति निर्माण होतात,
  इसे लेख तरुणांनी आवर्जुन वाचावेत , सर्व शंकाचे निरसन होईल

  तरुणांनी उस्फुर्त प्रतिक्रिया देने, प्रश्न विचारणे, समजुन घेणे येथे अपेक्षित आहे

 2. suresh mane says

  if we have sex with multiple partner without condom but they all hiv negetive . then we occure HIV from they

  1. let's talk sexuality says

   लैंगिक जोडीदारांमध्ये कुणाला जर HIV/AIDS चा संसर्ग नसल्यास त्याचा प्रसार इतरांना होणार नाही.
   हे जरी खरं असलं, तरी एखादया व्यक्तिला HIV/AIDS आहे किंवा नाही हे वर वर पाहता कळत नाही. त्यासाठी चाचणी/ टेस्ट करावी लागते. अन ही चाचणी असुरक्षित शारीरिक संबंध/निरोध शिवाय संबंध आल्यानंतर 3 महिन्यांनी करावी लागते. तेव्हा या सगळया गोष्टी पाहता HIV/AIDS व इतर लिंगसांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी निरोध वापरणे कधीही सुरक्षित आहे.

  2. Amol says

   विवाहित असताना दुसरी
   विवाहित स्त्री(एचआयव्ही नसलेल्या) शी कंडोम न वापरता सेक्स केल्यास एचआयव्ही कीव एड्स ्चा धोका. होऊ शकतो का?? (तिच्या पती शिवाय तिच्या आयुषाय मी सोडून कोणी नाही आणि पतीला पण कोणताही एड्स एचआयव्ही प्रॉब्लेम नाही )

   1. let's talk sexuality says

    ज्या ज्या लोकांनी एकमेकांसोबत संबंध केलेले आहेत, त्यापैकी एकालाही hiv/aids चा संसर्ग नसेल तर तो दुस-यांना संसर्ग होण्याचा शक्यता नाही.
    सोबतच्या लिंक पहा.
    https://letstalksexuality.com/hiv_aids/
    https://letstalksexuality.com/hiv-aids-existence-origin-and-human-transition/

Comments are closed.