वूमन इनफ्

Poem by Erica Jong

1,350
माझ्या आईचे व आजीचे दिवस
कणीक मळण्यात, शिवण-टीपण करण्यात,
स्वयंपाकघरातील उपकरणे दुरूस्त करून
घेण्यात कसे वाया गेले हे मी बघितले आहे.
म्हणून तर स्वच्छ घर आवडत असूनही
मी घरात धूळ साचू देते. कपडे लाँड्रीत पाठवते.
कणीक मळण्यापेक्षा माझी बोटे टाईप करण्यासाठी वापरते.
सूपच्या वासाऐवजी कागदाचा आणि शाईचा वास घेते.
मला मनापासून वाटते
मला एकाऐवजी दोन रूपे असायला हवी होती.
दिवसही अधिक मोठे असायला हवे होते;
पण ते तर लहान आहेत.
मग काय करणार ? मी लिहीत राहते.
घरात धूळ साचतच राहते.
माझ्या आजीने, आईने
स्वतःऐवजी घरावरच प्रेम केले.
त्याऐवजी हे बरे नां ?
मी ज्याच्यावर प्रेम करते
तो स्वयंपाकघर आवरतो.
थोडी अगदी थोडी-थोडीशीच तक्रार करत.
कारण त्याला ठाऊक आहे;
इतक्या शतकांनंतर
माझ्यापेक्षा त्यालाच अधिक सोपं जाणार
आहे.

– एरिका याँग (Erica Jong) या कवयत्रीच्या ‘वूमन इनफ्’ या कवितेमधून.

Adv Archana More यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार ….

Comments are closed.