World Mental Health Day 2018

826

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनूसार भारताच्या 135 कोटी लोकसंख्येपैकी अंदाजे दहा कोटी  (म्हणजे 7.5 %) लोक हे कोणत्या ना कोणत्या मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. काहींच्या आजाराचे स्वरुप सामान्य तर काहींच्या अतिशय गंभीरही आहे.

एकूण मानसिक आजारांपैकी अर्धे अधिक मानसिक आजार हे वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच सुरू होतात. बहुतेक वेळा माहितीचा अभाव आणि अशा आजारांकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन यामुळे वेळेत उपचार केले जात नाहीत. किशोरवयीन मुलांबद्द्ल बोलायचे झाले तर निराशा (डिप्रेशन) हा या वयातील मुलांमध्ये आढळणारा प्रमुख आजार आहे.

15-29 वर्षांच्या मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे प्रमुख कारण म्हणुन पुढे आले आहे. आपल्या देशामध्ये दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते.

किशोरवयीन मुलांकडून होणारे मदयपान, धुम्रपान, आणि अंमली पदार्थाचा (ड्रग्स) हानीकारक वापर हा अनेक देशांमध्ये मोठा प्रश्न बनला आहे. यामुळे हिंसा, असुरक्षित लैंगिक संबंध किंवा धोकादायक ड्रायव्हिंगमुळे होणारे अपघातांचे प्रमाण चिंताजनक बनले आहे.

या परिस्थितीत मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाला प्राथमिक उपचार मिळण्याची सोय सरकारने करणे आवश्यक आहे. सामाजिक, वैद्यकिय व शैक्षणिक क्षेत्रात मानसिक आरोग्याला अनुसरुन व्यापक व एकत्रित कार्यक्रम करणे गरजेचे आहे. किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याची जागरुकता वाढविण्यासाठी समवयस्क मित्र, पालक आणि शिक्षकांना या मुलांना कशी मदत करावी याप्रकारचे दुवा साधणारे कार्यक्रम तयार करावे लागतील.

आपल्या राज्याबाबत बोलायचे झाले तर मानसिक आरोग्यासाठी लागू झालेल्या मानसिक आरोग्य कायदा 2017 ची निधीअभावी महाराष्ट्रात अद्याप अंमलबजावणीच झालेली नाही.

आपण आपल्या आयुष्यात आनंदी, तणावरहित राहुन इतरांची काळजी घेऊ, असा आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने निर्धार करु.  

मानसिक आरोग्याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की लिहा.

Comments are closed.