प्रश्नोत्तरेमाझ्या लग्नाला ९ महीने झाले गर्भधारणा होत नाही पाळी चक्र ओके आहे काय केले पाहिजे गर्भधारणेसाठी

1 उत्तर

पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. मासिक पाळी चालू झाल्यानंतर साधारण १२ ते १६ दिवसांनी अंडोत्सर्जन होतं. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे तुम्हाला पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. गर्भधारणा नक्की कशी होते? याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/conception/
गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संबध ठेवूनही अनेक महिने मुल होत नसेल तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बऱ्याचदा आपल्या समाजात मुल होत नसेल तर स्त्रीलाच जबाबदार धरले जाते मात्र हे चुकीचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संबंध असतो. त्यामुळे दोघांसाठीही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संभोग केल्यानेदेखील गर्भधारणा होत नसेल तर अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.
https://letstalksexuality.com/questions-2/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 13 =