गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत.
बहुतेक स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय, बीजवाहिन्या आणि बीजकोष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री बीजं असतात. वयात येण्याच्या काळात बीजकोषातली बीजं परिपक्व किंवा तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. गर्भ तयार होईल या शक्यतेनुसार गर्भाशयामध्ये अनेक बदल होतात. गर्भाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं. मात्र पुरुष बीज न आल्यास हे बीज तिथेच विरघळून जाते आणि त्यानंतर 12-16 दिवसांनी गर्भाशयाचं अस्तर गळून पडायला लागतं. म्हणजेच पाळी येते.
पुरुष बीज कुठून येतं?
पुरुषाच्या शरीरात वृषणांच्या आत दोन बीजकोष असतात. मुलगा वयात येऊ लागला की या बीजकोषांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने पुरुष बीजं तयार व्हायला लागतात. यांनाच शुक्राणू असंही म्हणतात. असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बीजं तयार होतात. आणि त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं!
लैंगिक संबंधांदरम्याल जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतं तेव्हा एका क्षणी लिंगामधून वीर्य बाहेर येतं. या वीर्यामध्ये लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं असतात. ती पोहत पोहत बीजवाहिन्यांच्या दिशेने प्रवास करू लागतात. बीजवाहिनीमध्ये तेव्हा स्त्री बीज असेल तर एक पुरुष बीज स्त्रीबीजामध्ये शिरतं आणि त्यातून फलित गर्भ तयार होतो. हा फलित गर्भ पुढील १० दिवसांमध्ये पुढे सरकत येतो आणि गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतो. ही सर्व प्रक्रिया निर्धोकपणे पार पडली तर गर्भधारणा झाली असं म्हणता येईल.
पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.

121 Responses
खरंच फार इंटरेस्टिंग आहे………निसर्गाची रचना…………………
Ho khup vichitra ashi devachi lila aahe
11 April la mala period aala aata 11 may la majha period miss jhala mag me kiti divsani pregnancy check karu
Amcha aatach first time sex jhalel Feb madhe..tevha amhi ekdach kelel Ani direct 5 mahine amhi ekatra navhto… mg aata 10th sept pasun parat start kelay…tar penis patkan aat jaat nhi thoda vel lagto…tar as hota ka ? Ani amhi aata balakarta plan kartoy … faqt 3 diwas jhaley start karun .. tar penis aat proper jayla kiti Vela sex karun jaat easily… pleasseee replyyy…
जोडीदाराची संभोग करण्याची पहिलीच वेळ असणे आणि पहिल्या संभोगाच्या वेळी कधी कधी योनीमार्गातील स्नायु आकसले जातात व त्यामुळे संभोगादरम्यान लिंगप्रवेशाला त्रास होऊ शकतो. या अवस्थेला Vaginismus (योनीआकर्ष) म्हणतात. काहीवेळेला योनीपटल (Hymen) फाटलेले नसणे हे ही कारण असू शकते. खरे तर योनीमार्गातून येणाऱ्या स्त्रावांमुळे संबंध सुखकर होत असतात. लैंगिक उत्तेजना निर्माण झाल्यानंतर स्त्रीच्या योनिमार्गामध्ये, तोंडामध्ये जशी लाळ असते तसा, एक स्राव तयार होतो. हा स्राव योनिमार्ग ओला ठेवतो. हा स्त्राव संभोगाच्या वेळी वंगणाचे काम करतो. योनिमार्ग जर कोरडा असेल आणि घाईने त्यामध्ये पुरुषाचे लिंग शिरले तर ते स्त्रीसाठी वेदनादायी ठरू शकते किंवा लिंगप्रवेशाला त्रास होऊ शकतो. जास्तीवेळा सेक्स करण्याचा आणि योनी सैल होण्याचा काहीही संबंध नाही. योनीचे स्नायू अतिशय लवचिक असतात. त्यामुळे तुम्ही दोघांनी संबंधांच्या वेळेला मनावर कुठलाही ताण न ठेवता रिलॅक्स राहायला हवे. त्यानंतरही असेच चालू राहिले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Mla nehmi vangan nahi yet tar chalel na tas ??.. pn normly ti jaga Oli aste Ani husbnd thod oil use kartat….
Oil-based वंगण वापरल्याने तुम्हाला जर काही त्रास होत नसेल जसं की खाज येणे, irritation होणे तर ते वापरायला काही हरकत नाही. मेडिकलमध्ये ह्या पद्धतीची वंगणे मिळतात, तुम्ही ती वापरू शकता.
Ok thank you so much
Mala anda kadhi tayar hot te mahit ahe tyavelet aamhi sambhandh pan thevat ahot pn concive hot nahiye kay problem asel and tayr houn futat sambhanndh pn yetat tya divsant viry baher yet
गर्भधारणेसाठी पाळीचे चक्र, त्याची नियमितता, बिजविमोचनाचा कालखंड, पुरुषबीजे व त्यांचे प्रमाण, अशा अजुन खूप काही बाबी कारणीभूत असतात. पुरुषबीज गर्भाशयामुखातून गर्भाशयात पोहोचायला काही अडचण असू शकते, काहीवेळा काही कारणांमुळे स्त्रीबीजवाहिनीत अडथळा असू शकतो. त्यामुळे पुरूषबीज स्त्रीबीजापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे जरी अन्डोत्सर्जन वेळेवर होत असेल तरी इतर काही अडचण आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही दोघांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
गर्भधारणा होऊ नये म्हनुण काय करावे.व मला कंडोम वापरु वाटत नाही.
Palinatar Sam ani visham divas kase olakhave….
Hii..mam..mla volution jhalya pasun khup tras hotoy pottcha khaycha bhagat dukhte aani dok tap yete ..vomiting sarkh pn hote ..he as ka hote
Actually mi unmarried ahe pan ml periods nantr spotting hot ast hospital tablets sgl kel tablets sample ki parat spotting stat hot
पिरीयडस नंतर स्पॉटिंग होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. बऱ्याचदा हॉर्मोन्स मध्ये काही बदल झाल्यामुळे ही असे होऊ शकते. कोणत्या कारणामुळे असे होते आहे हे समजले तर त्यानुसार उपाय करता येईल. तुम्ही एखाद्या स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
Pali yeun gelyavarr kiti divsane sex karava
sh****************@***il.com
mala 6 day pasun problem aala nhi
plz rly pregnacy nako ye
i m married 9 month zhale maried la
pali yenyasathi upay
PApai kha
Jar wife Che himoglobin kami asel tar ti pragancy hote ka allmost 10 havi pan 5.5 ahe tar nakki Kay problem ahe pragancy honar ki nahi
Palichya ek athavadha adhi fakt ekdach sambandh ala tar garbh rahu shakto ka
palichya week madhe sambandh aala tr garbh yeu Shakto ka? & 3 months zale Pali aaleli nahiye ajun tevhapasun… please solutions sanga….
palichya week madhe APASHT SAMANDH aala tr garbh Rahu Shakto ka? & 3 months zale Pali ajun aaleli nahi.. please upay sanga….
पाळी येण्याआधी सेक्स केल्यास गर्भधारना होउ शकते का?
अंडोत्सर्जनाचा काळ कसा ओळखायचा
सर सेक्स केल्यानंतर पाळी लवकर आली तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का।।कारण पाळी लवकर आली आहे।।त्यामुळे।दरवेळी 28 ला येते पण आता 13 लाच आली आहे।।plz।मला सांगा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का?
Pali yet aasel tr confirmed, pregnant Nahi Aasa Ahe ka, ki period pn suru aaani pregnancy pn asa hote ka?
Masturbation kelyane tabyet kami note ka?
Jar hot asel tar kiti divasanantr karave
मला आठ दिवस जास्त झाले आहेत. किट ने तिन वेळा वेगवेगळ्या दिवशी चे क केले पन नाही दाखवत आहे ऊपाय सुचवा
दिवस केल्यावर पाळी येते का
Pali samplyavar Dusrya divshi sex kelyavar pregnant rahu shakte ka
पाळी येण्याच्या 1-2 दिवस आधी सेक्स केल्यास घर्भधारना होते का
संबंध झाली आहेत परंतु वीर्य योनी मधे सोडले नाही तरी गर्भ धारण होईल का ??
Mi unmarried aahe n maza period time var yet nahi n last month madhe 11la aaleli pan ajun hi aali nay aahe n mi aata firayla geleli with bf so amchat sex zala but protection gheun zalela n ekda ch first time navta ghetla but Teva Kahi kela navta amhi tyala nightfall zala hota n te maza paya var padla hota so Kahi chances aahet ka ?? Pls reply
Period houn 7-8divs zalet mg sex kelyavr preganancy yete kka plss soluatin
Me mazya girlfriend sobat tichi masik pali samplyawar 4/5 diwasani me kandom vina sex kelya tar ti pregnant hoil ka
मी एका मुलीसोबत संबंध ठेवले होते पण तिला मी संबध ठेवन्याच्या अगोदर पासूनच तिला पाळी येत नह्वती तिचे वय 17 आहे काय झाल असेल ती गरोदर असेल का?
Maza gf barobar sex zala ahe but sex kelyanantar after 3 days ne tila pali ali tar ti Pregnent asel ka
Nirodh na waparta Sex karteweli strichya yonit wirya nahi gelyawar stri garodhar rahu shakte ka ?
पहिली गर्भधारणा झाली होती 3 महिन्याचा गर्भ खराब झाला आता गर्भधारणा होत नाही
Sex kelyanatar 8 divsani pali ali.. Tar pregnancy che kahi chance ahe ka..
palichya 14 vya divshi sex kelyane pregent hote ka?
तोंडाद्वारे विर्य पोटात गेल्यावर गर्भधारणा होते का
Sex kelyavar MC yet nahi ka…???
Kinva kahi divas ushir hoto ka MC yenyasathi
अन्डोत्सर्जन मणजे काय
पाळीदरम्यान रक्तस्त्राव खुपच कमी म्हणजे पाळी येते त्यावेळी थोडा होतो नंतर तीनही दिवस पुर्णपणे बंद असतो माझ्यामध्ये अंडोत्सर्जन होत असेल का? मला गर्भधारणा होऊ शकते का? प्लीज मला सवीस्तर माहीती द्यावी.
Aamhi pregnancy sati try Kelay 1month 12 day zale ashet pan misses Chya angavar white hotay he pregnancy c hi lakshne aahet kat?
माझं लिंग थोडं वाकडे आहे…तर त्यावर उपाय काय आहे
Namste Maze nav. Mansi age 26 lagnala amchya 3 varshe houn gelet.. Balacha vichar kela nahi tya darmyan pan ata Mazi ichha hot ahe.. Gelya mahinyat 1 tarkhela mala periods ale tyanantr ya ya April mahinyat mala 1 kinwa mage pudhe yayla have hote pan nahi ale periods.. Then manat aani dokyat satat ekach vichar MI pregnant tar nahi na.. Pn 7 tarkhela eveningla mala pali ale khup man heart Zale Maze.. Aj Maza 3 rd day ahe.. Plz mala aai vhayche ahe tar Kay kele have tya sathi.
फोलिकलर स्टडी सोनोग्राफी मध्ये सिस्ट म्हणजे नेमके काय
mazya partnarchi Masik pali zast divas rahili ahe ajun blooding hotya kahi problem ahe ka ,pls reply
Ya mahinya ajun pali aali nahi aani sex kel v viray yonit gel tar divas jatil ka
1st avotion jhal asel tr pregnant hou shkto na
सेक्स करते वेळी मी माझ्या gf च्या योनी मधेच माझ वीर्य विसर्जन केला तर तीला कीती दिवसांनी गर्भधारणा होईल,आणि आम्ही पहिल्यांदा शरीर संभोग केलंय?
First time sex kartana shukranu at gele pan yonicha padada fatla nasel tar garbhdharana hote ka?plzz riply now…
सर माझा एक प्रश्ण आहे तो म्हणजे माझा misses चा योनी मधून नेहमीच व्हाइट निघता याचा मागे कारण आनि माझा लग्ना la पण 4 वर्ष झाली आम्ही खूप Trai केले पण नॉट गेट प्रेग्नंट she
Aamhi baby sathi try karat aahot….but ya month madhe date aali nhi …pan date chya ek divas nater 2-3 drops bleeding zaal….asa 2-3divas 1-2 drops bleeding zala…tar kai samjav……pregnant asel tar asa hou shakta ka?
Mazi pali ekdum regular aste so pls advise
सेक्स केल्यावर किती दिवसात महिला गरोदर राहू शकते
I pill khallyawar pregnancy hot nahi na
Mi sex nantar 12 hr ne ipill khalliy pan thodi bhiti watatey
Sir/Madam,
mahilamadhya aj kal garbhashayachi pishavi kadhnyache anek prasang yeu lagale ahet. krupaya tya magai mul karane sanga. tasech bhavishyat ase hou naye tyavarhi
yogya margdrashan kara.
संभोग किती दिवस केल्याने मुल होते? म्हणजे 9 व्या महिन्यापर्यंत संभोग करावा की एकदाच केल्याने मुल होते
onths ago
palichya 14 vya divshi sex kelyane pregent hote ka
Sir aamhi pahilyandach sex kelay tehi Condom use Karun masik Pali 18 tarkhela yayachi pan aali nahiy. Please suggest.3 divas var gelet aani sex 11 tarkhela kelay
सर
Amhi masik palichya 5 te 6 divasanantar sex kela without condom pan virya yoni madhe janar nahi yachi kalji ghetli pan ata tila ultya zalya sarkh vatat ahe ajun tichi masik palichi date pan ali nahi tar ti pregnant asel ka ? Pls marg sanga.
पाळी नन्तर सेक्स केल्यावर किती दिवसांनी गर्भधारणा होऊं शकते
Sir / madam sir meri wife ki date 24 hai or hamne use 5- 6 din pahile sex kiya or 24 ko barabar mc aayi lekin sirf 2 din or thoda hi blading huva to kya aise me pregnant ho sakti hai kya?
Pali yenya agodr 30 date .sex kela pali 5 LA yete pan pali ajun Ali nahi condom use kela nahi ani viry purn baher padle tari AAT made gele asel yachi khatri nahi .tar garodhr asu shkte ka
प्रत्येक महिन्यात पाळी 28 दिवसाने येते मात्र या महिन्यात पाळी 34 दिवसांनी आली आहे तर मग या महिन्यात ovulation पाळी नंतर कितव्या दिवशी होईल कारण या महिन्यात बाळा साठी chance घ्यायचा आहे
लग्न झाल्याच्या एक महिन्याच्या आत गर्भधारण होऊं शकते का
Mi ekdach samband banvile ata 40 diwas zale pali nahi ali ekda samband jhalawar garbhawati rahu shakte ka
मी सेक्स केला पण मुलीच्या योनीच्या आत
वीर्य चे थेंब पडले नाही तर ती प्रेग्नेंट होईल का??
Palichya 6 vya divshi sambandh ale tr pregnant hou shakte ka?
योनीत शुक्राणू गेले नाही तर। प्रेग्नेंट राहतात का मुली
Garbhdharanenantar kiti divsani urine pregnancy test karavi?
लग्न झाल्यानंतर ही बाह्य संबंध राहीला त्यामुळे आपण pregnant आहे असे कळले.आणि नकळत पणे पुन्हा नवर्यासोबात संबंध आला त्याच वेळी तर होणारे मुल कोणाचे असणार नवर्याचे की बाह्य संबंध ठेवलेल्या व्यक्तीचे ..
maz age 27 running ahe..maze palichakra 27 days che ahe.month to month pali yete mla..lagnala 1 mahina 15 days zale ahet.magchya mahinyatlya palichya 4th day pasun sexx hoto amcha roj..mala aambat padarth khavese vatatat,kaccha ric,bhajki supari khavishi vatte pn mazi palichi date chukli ahe..date chukun 2 days zale ahet..mla white janyacha pn tras ahe..tr mi pregnant rahu shakte ka plz sanga??
Maj lagn aatach jahl 2march la aani aamchyat sex 7la jhala aani tila Pali 8la aali mg pregnant houskte ka
Majya gf la mashik pali aali hoti tevha mi sex kel hot pn tila ata mashik pali yet nahi laghavi pn check keli dr kade jaun pn dr bole kahi nahi jhal mg mashik pali ka nahi yet tila ajun tichi date jaun aaj 10 divas jhale taripan pali yet ka nahi place Ripley
पाळी च्या चौथ्या दिवशी सेक्स केला तर 15 दिवसांत समजते का लेडीज ला गर्भधारणा आहे म्हणून
Me palichya 8 wya diwashi sambhog kela tar hatbhadharna howu shakate ka pali 22 diwsanantar aali hoti
Mazi 24 date hoti tyanntr sex kel. Next month 23 la pali ali… Tya nntr 9 la punha 1 day bliding zal. Ani ata ajun pali ali nahi. . Tr pregnant asnyache chance astil ka
Sir mi safety vaprun gf sobat sex kela tichi date jhalyavr 8 vya divshi pn tila hya mont madhe period ahe nahit aaj 17 divas jast jhalet mi 3 vela pregnancy chack kelo but negative dakhvat ahe ntr doctor kade gele tyani blood chack kele tyat hemoglobin kami ahe as dakhaval tr sir ti pregnent ahe ki nahi he kas kalel mala va tiche period ananya sathi kay karayla hav sanga sir plz
hi… periods nantr kadhi sambandh thevle tr pregnancy rahu shakte? nemka kal kay asto
periods nantr 14 divsani sambandh thvle tr pregnancy rahu shakte ka
Masik palichya aadhi chya aadhi 19 divas aadhi condom use karun sex kela tr pregnant hou shkt ka ? Karan periods date nighun geliy
लग्नाला मागच्या महिन्यात १ वर्ष पूर्ण झाले असून अजूनही प्रेग्नन्सी रहात नाही प्रयत्न सुरू आहे उपाय सुचवा प्लिज
मिसेसची मासिक पाळी नेहमीच्या पेक्षा १५ दिवस लेट होतेय
मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवलयास गरोदर राहू शकेल?
I mean पाळी झाल्याचा दुसऱ्या दिवशी पासून?
आम्हाला ovulation date Conform होइना
उपाय सांगा.
Anal sex try kartana jar vagina varti sperm padlyane mhnje vagina madhe penis n ghalta..sperm aat jaun pregnancy hou shkte ka ?
Lagnala 4 month zalee tripan prgnant hot nahi kahi upay ?
सेक्स करताना पत्त्निला अति उत्साहित करण्यासाठी काय करावे
मासिक पाळीचा दुसऱ्या दिवशी बिना कंडोम सेक्स करताना जर थोडे वीर्य जर योनीच्या आत गेले तर प्रेग्नंट होऊ शकते का
किती दिवस संभोग केल्याने स्त्री गर्भवती होते
कॅल्शिअम कमी असल्याने गर्भ धारण होते का ?
पाळी चा ४० दिवसांनी येते तर गर्भ धारण होईल का
3 महीन्यापुर्वी sex केला असेल आणि त्यानंतर 2 months periods झाले असतिल पण तिसर्या month मधे periods व्हायला नसेल तर pregnant असू शकते का…?
मी गर्लफ्रेंड बरोबर पली नंतर 7 दिवसांनी असुरक्षित सेक्स केला . आणि मी तिला गर्भनिरधक गोळी दिली आहे तरी ती प्रेग्नेंट राहू शकते का
GF ne pant ghatleli astana barobar yoni aste tya thikani virya skhalan zale tar pregnancy rahu shake ka….?
Majhya mc che days 45 ahet TR ovulation period kadhi asel
Amhi june made sex kela hota tiche june july che period ok ale August cha period 10 dayz late zala amhi tya divshi with out Condom sex kela tya ratri period ale….ti pregnant asu shakte ka ani late zale tr ka zale kiti dvs late zalela comman ast….. pahili period date 27 hoti ata dusrya month made 6 la ala ahe
मुलं होण्यासाठी पाळी आल्यावर कितव्या दिवशी सेक्स करावा
Pridous madhe jr sex kele tr prenent hou shkte ka
As per ultrasound maxi pregnancy 14 .2week Aahe pn LMP PRAmane 12 week aahe . last LMP madhe khupach kami bleeding zale hote. Tr atta LMP Koanati pakadu ani pregnancy konatya month Pasun count Kari?
नमस्कार,
माझी पाळी गेल्या महिन्यात म्हणजे ९ मार्च ला आली होती त्या नंतर १८ मार्च ला आमचे संबंध आलेत. या महिन्यात अजून पाळी आलेली नाही, नॉर्मली ३-४ दिवस आधीच पाळी येते. मी टेस्टिंग किट ने दोनदा चेक केले आहेएकदा ८ मार्च ला आणि दुसऱ्यांदा १२मार्च ला पण त्यात रिझल्ट निगेटिव्ह येतो आहे. मला गर्भधारणा नकोय, तरी आपण मार्गदर्शन करावे हि विनंती.
Porn vedio roj pahanyachaa ani masik palicha khi sambandh ahe ka?
Porn vedio continue paahili tar shariravar vait parinaam hotat ka?
Mi sex vedios pahilya hotya. Maji Pali ajun ali nhu. Barobar 1 month jhala
मी माझं लिंग वरच्या वर स्पर्श केल ,तेव्हा वीर्य नव्हत निघालं ,मला योनीच ओली लागली होती , आणी 3 दिवसानी तिला नियमित प्रमाणे पाळी आली
तर काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार …
Hii mam maza mazya husband sobat 8 divsa agodr sex zala hota pan ata mazya yonitun Pink colour ch blood jat ahe jast nahi jat pan viryamdhe mix houn jat aahe tr yach nemk karan Kay?
Majya mitrane mala pathimagun mithi marli. Tevha tyachya linga cha ताठरपणा mala jaanavla.
Pan angavr purn kapade hote.
Tari manat ugach hurhur lagte ki pali velet yeil ki nahi
Mala mahit ahe pregnancy baddal pn tari kuthe tari manat bhiti vatte.
Mi sex kelela nahi. Pan maji pali chi date houn 5 divas jhale. Ajun pali ali nahi.
Ya adhi asa kadhi jhala nahi tyamule hurhur vatte.
Ani angavar white jaata thoda thoda. Asa vatta ki pali yeil pan fakt white jatay.
Plz margadarshan kara
Ani mi थायरोईड check karaun ghenyachi ahe ka?
Kapadya varun jar yekmekanna sprash kela agadi main jaagi suddha. Kinva mithi marli tar tyamule tentions kami hotat he thik ahe.
Pn tyamule mulila kahi problem hou shktat ka?
Kapde ghaslaver saprem baher alaa nahi tar praganent hoin ka
प्रेग्नसी राहण्यासाठी स्पर्मचा योनीमध्ये प्रवेश होणे गरजेचे आहे. तुम्ही सांगताय त्या परिस्थितीत प्रेग्नसी राहण्याची शक्यता खूपच कमी आहे.
Sambandha amche continue ahet 2 weeks nantr me pregnancy test keli tary ajun show hot nahi ahe kay reason asel
गर्भधारणा झाली नसेल तर टेस्टवर दिसणार नाही. प्रत्येक संबंधानंतर गर्भ राहिलंच असं नाही. जर तुम्ही बाळासाठी आताच प्रयत्न सुरु केले असतील तर आणखी काही महीने लागू शकतात. तुम्ही किती काळ प्रयत्न करत आहात व प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यानुसार तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
जेव्हा स्पर्म स्त्रीच्या प्रजनन मार्गात अंड्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचे फलन करतात तेव्हा गर्भधारणा होते. जर वीर्य किंवा शुक्राणू योनीत प्रवेश करत नसतील (उदाहरणार्थ, जर बाहेर स्खलन झाले आणि योनीत काहीही गेले नाही), तर गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुम्हाला यासारखे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही Ask Prayas – शी केव्हाही आणि कुठेही बोलू शकता! हा खास चॅट असिस्टंट WhatsApp वर उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे प्रश्न पूर्ण गोपनीयरित्या विचारू शकता.
लिंकवर क्लिक करा आणि हवी ती माहिती मिळवा..
https://wa.me/message/3W664ZJRKAQ5D1?src=qr
आणखी माहितीसाठी हा video बघा: https://youtu.be/s3Czg6xq-3A