प्रश्नोत्तरेलिंगाची जाडी लांंबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय
Aarvin aaglave replied 2 years ago

लिंगाची जाडी लांबी

1 उत्तर

लिंगाची जाडी आणि  लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय किंवा शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. मुळात तुम्हाला लिंगाचा आकार का वाढवायचा आहे यावर विचार करा. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग लहान आहे की मोठे यापेक्षा  संबंधाच्या वेळी ते ताठ राहते का ? तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला लैंगिक सुख मिळते का? हे जास्त महत्वाचं आहे. लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे. बहुतेक वेळा पौरुष आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात. लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान हा विषय प्रश्न उत्तरांमध्ये अनेकदा चर्चिला आहे. अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.compenis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/ ही लिंक पहाल.

rahul replied 9 years ago

सतत हस्तमैथुन करने योग्य की अयोग्य

Shiva Swami replied 2 years ago

उपाय सांगा

Shiva Swami replied 2 years ago

उपाय सांगा

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 2 =