आकार नाही तर आनंद महत्वाचा !

पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण पुरुषांवर असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom. ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर बिंबवल्या जातात. लैंगिकतेविषयीचं अपूर्ण वा अर्धवट ज्ञान, अनेक गैरसमजुती यामुळे अनेक पुरुषांमध्ये न्यूनगंड दडलेला असतो. लिंगाच्या आकाराविषयी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे? लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का? लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का? लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखास बाधा येते का? लिंगाचा आकार वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर विचारले गेले. हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन वेबसाईटच्या वाचकांसाठी ही माहिती देत आहे.

सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे?

लिंगाचा आकार केवढा असावा याचा काही विशिष्ट मापदंड नाही. प्रत्येक पुरुषाच्या उत्तेजित लिंगाची लांबी आणि जाडी वेगवेगळी असते. उदा. काहींचं ४ इंच, काहींचं ५ इंच तर काहींचं ६ इंच. साधारणपणे लिंग ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का,  तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. उत्तेजित लिंग जर २ इंचांपेक्षा कमी असेल तर ही समस्या असू शकते यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का?

लिंग हे पूर्णपणे सरळ असतंच असं नाही. ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं यात काहीही गैर नाही तसेच यामुळे लैंगिक सुखास किंवा गर्भधारणेस काहीही अडचण येत नाही.

लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखास बाधा येते का?

लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. उत्तेजित लिंग जर दोन इंच किंवा त्यापेक्षा मोठे असेल तर लैंगिक सुखामध्ये कसलीही अडचण येत नाही. अनेक पुरुषांमध्ये आपल्या लिंगाची लांबी पुरेशी आहे का? आपण जोडीदाराला पूर्ण लैंगिक सुख देऊ शकतो का? याविषयी असुरक्षितता असते. बहुतेक वेळा मर्दानगी आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात.

लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का?

शास्त्रीयदृष्ट्या सागायचे झाले, तर गर्भधारणेसाठी लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचण्याइतपत पुरेसे लांब असावे. एका वीर्याच्या थेंबामध्ये हजारो शुक्राणू असतात आणि गर्भधारणेसाठी एक शुक्राणू पुरेसा असतो. उत्तेजित लिंग जर  २  इंचापेक्षाही कमी असेल तर मात्र ही समस्या असू शकते यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

लिंगाची जाडी किंवा लांबी वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का?

लिंगाची जाडी आणि  लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय किंवा शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. कसोटीस न उतरलेले हे उपाय अनेकदा भोंदू वैद्यांकडून किंवा बोगस औषध कंपन्यांकडून सुचविले जाण्याची शक्यता असते. खरंतर हे उपाय उपयुक्त ठरण्याऐवजी उपायकारक ठरू शकतात. या लेखामध्ये दिलेल्या माहितीतून आपल्याला हे समजले आहे, की लिंगाच्या आकाराचा आणि लैंगिक समाधानाचा किंवा गर्भधारणेचा काहीही संबध नाही. याचाच अर्थ जर उत्तेजित म्हणजेच ताठ लिंग जर दोन इंचापेक्षा मोठे असेल तर लिंगाची जाडी किंवा लांबी कशाला वाढवायची ?

थोडक्यात काय तर, ‘आकार नाही तर आनंद महत्त्वाचा !’

चित्र साभार: http://www.gq-magazine.co.uk/article/average-penis-size-facts

18 Responses

  1. प्रवीण says:

    माझे वय 22 आहे।
    माझं लहान पण पासून 1 वृषण लहान व 1 मोठे आहे ।
    सद्य काही त्रास नाही ।
    हस्तमैथुन करतो।
    पन लिंगावरची कातडी मागे होत नाही।
    याचा काही परिणाम मला लग्न नंतर होईल का?

  2. nihal says:

    Ling made tath pana kami ahe, te kase tath karu, maje vay 20 ahe. Upay sanga

  3. vikrant shanke says:

    तथापि आणि i सोच let’s talk about sexuality हा जो उपक्रम आहे तो मला वाटतोय आजची खरी गरज ओळखून चालवला जातोय. माजे वय आता 20 वर्ष आहे. आणि पौउगंडा अवस्थेत मुलाना सेक्स बद्दल जे प्रश्न पडतात तसे मलाही पडायची पण माज वाचन चौउफेर व खूप असल्याने मला त्याची उत्तर मिळवणं सोप गेल. पण आता या उपक्रममामुळे लैंगिक जागृतीस चालना मिळणार आहे. तुमच्या या कालसुसंगत उपक्रमास शुभेच्छा ! गरज असेल तर मी ही विषयानुरुप लेख लिहून तुम्हाला मदत करेन. तुम्ही माज़ नाव किंवा मैल आय डी सूद्धा प्रसिद्ध करू शकता

  4. देव says:

    लिंगाची लांबी व जाडी कशी मोजावी?

  5. Rahul says:

    माझ्या लिंगची लांबी आणि जाडी खूप कमी आहे तर मी काय काय???

  6. Vivek says:

    सर, मला हस्त मैथुन करण्याची सवय आहे,खूप जास्त वेळ करतो तस म्हणजे रोजच या गोष्टीचा माझ्या लैंगिक क्षमतेवर काय परी नाम होईल का?

  7. Vishnu says:

    Ling madhun darroj pani yet aahe puthe kahi problem tar nahi hota na bal honyasathi

  8. Sachin says:

    माझे लग्न नाही झाले अजून तरीही माझे लिंग आणि अंडकोश दोघेही loose झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap