प्रश्नोत्तरेपाळी विषयी माहिती

माझा माझ्या g.f बरोबरसेक्स झालाय त्यानंतर तिला अनवाँन्टेड पन दिली 72 तासांच्या आत तरीपन तिला पाळि आली नाही तीची डेट आहे 18 ची तर तिला पाळीयेईल कात्यासाठी काय करु

1 उत्तर

गर्भधरणेमुळे पाळी चुकली असेल तर ती यावी म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे गर्भधारणा झाली आहे का ते तपासावे लागेल. मेडिकल दुकानात घरीच गर्भधारणा तपासण्याचे कीट मिळते. त्याचा वापर करून तुमची जोडीदार ते तपासू शकेल. आणि मगच पुढील निर्णय घ्यावा लागेल. दोन ते तीन कीट आणून दोन ते तीन दिवस ते तपासा. गर्भधारणा झाली नसेल तर थांबा, पाळी येईल. अनेकदा पाळीत अनियमितता आढळते.

ही झाली आवश्यक माहिती. पण तुम्हाला एक सांगणं गरजेच वाटतं. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे नको असलेल्या गर्भधारणेची शक्यता तर असतेच पण एकमेकांना लैंगिक आजारांची देवाण घेवाणही त्यातून होऊ शकते. शिवाय असे वर्तन हे फार काही जबाबदारीचे नाही. ह्यात तुम्ही स्वतःला तर धोक्यात घालत आहातच पण तुमची जोडीदार त्यात अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. अशा अवांछित स्थितीत मुलींना अधिक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. याचा तुम्ही विचार करावा.

लक्षात ठेवा अनवाँन्टेड ई गोळ्या या गर्भनिरोधाचे साधन नव्हेत. त्यांच्या अति वापरामुळे मुलींच्या स्त्रियांच्या आरोग्याला धोका असतो. खाली काही लिंक्स देत आहोत. त्या वरील लेख वाचा. काळजी घ्या.

https://letstalksexuality.com/ecp/

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 16 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी