प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmala rojach sex karnyachi ichha hote parntu patnila hot nahi maze vay 40 patniche 34 aahe kahi upay sanga

1 उत्तर

प्रत्येकाची लैंगिक इच्छा वेगवेगळी असते. इच्छेविरुद्ध केलेला लैंगिक संबंध नकोसा आणि किळसवाणा वाटतो. त्यामुळे नात्यामध्ये देखील अडचणी येऊ शकतात. जोडीदाराची लैंगिक इच्छा आपल्यापेक्षा वेगळी असल्यावर असे प्रश्न उपस्थित होऊ शक्त. खालील काही गोष्टींची तुम्हाला मदत होऊ शकेल .

१. दररोज सेक्स करायलाच हवा असा आग्रह नको. तुम्ही किती वेळा सेक्स करता यापेक्षा तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आनंद मिळतो का? हे जास्त महत्वाचे आहे.

२. संवाद साधून जोडीदाराला सेक्समधील काय आवडते हे जाणून घेता येईल व त्यांचा सेक्समधील रस वाढवता येईल. सेक्ससाठी रोमँटीक आणि पूरक वातावरण तयार करता येईल. लैंगिक सुखास पूरक घटक हा लेख वाचा. https://letstalksexuality.com/sexual-pleasure/.

३. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना लैंगिक उत्तेजना आणि लैंगिक सुख मिळण्यास पुरुषांच्या तुलनेत उशीर लागतो. यामध्ये संवाद आणि फोर प्ले महत्वाचा ठरतो.

४. तुमचे प्रयत्न करूनही त्यांना दररोज सेक्स करावासा वाटत नसेल तर त्यांच्या मताचा आदर करणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 11 =