प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळीच्या चौथ्या दिवशी संबंध येऊन वीर्य अात पडलं तर गर्भधारणा होते काय
1 उत्तर

मासिक पाळी गर्भधारणेच्या टप्प्यातील दुसरी पायरी आहे. गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचं मिलन होणं आवश्यक असतं. स्त्रीच्या शरीरामध्ये दर महिन्याला(एका मासिक पाळी चक्रापूर्वी) एक(खूप कमीवेळा दोन) स्त्रीबीज परिपक्व होत असतं. स्त्रीबीज परिपक्व झालं की साधारण मासिक पाळी येण्यापूर्वी १२ ते १६ दिवस आगोदर बीजनलिकेत येतं. तिथे ते साधारण १२ ते २४ तास जिवंत राहतं. जर या काळात शरीर संबंध आले आणि पुरुषाच्या वीर्यातील लाखो/करोडो शुक्राणूंपैकी कोणताही एक शुक्राणूचं(पुरुषबीजाचं) मिलन स्त्रीबीजाशी झालं तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. मिलन झाल्यानंतर ३ दिवसांनी एकत्र झालेली स्त्री आणि पुरुषबीज गर्भाशयात येतात. म्हणजे बोली भाषेत पिशवीमध्ये येतात. आणि तिथं गर्भ रुजण्याची प्रक्रिया होते. याला म्हणयाचं गर्भधारणा झाली. जर बीजनलिकेत स्त्रीबीजाशी शुक्राणूचं मिलन झालं नाही तर गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. हे मिलन न झाल्यामुळं स्त्रीबीज तिथेच विरघळून जातं आणि यानंतर १२ ते १६ दिवसांनी मासिक पाळी येते.
मासिक पाळी येते म्हणजे नक्की काय होतं? ज्यावेळी पहिली मासिक पाळी संपते तिथून पुढे पुन्हा गर्भाशयात रक्ताचं अस्तर तयार व्हायला लागलं. हे अस्तर गर्भ रुजण्यासाठी आणि वाढीसाठी महत्वाचं असतं. जर गर्भधारणा झाली नाही तर हे अस्तर गळून पडायला लागतं. या गळून पडण्याच्या प्रक्रियेला मासिक पाळी येणं असं म्हटलं जातं.
त्यामुळं हे नेहमी लक्षात ठेवा..
१. मासिक पाळी आली म्हणजे तुम्हाला गर्भधारणा झालेली नाही. आणि मासिक पाळीच्या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसतेच. परंतू ज्या स्त्रीयांचं मासिक चक्र २० दिवसांच्या आसपास असतं त्यांनी योग्य काळजी घेणं फायदेशीर ठरतं.
२. शरीर संबंध ठेवताना योग्य गर्भनिरोधकांचा वापर करणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 15 =