लैंगिकता समजून घेताना…

लैंगिकता म्हणजे नक्की काय हा प्रश्न बऱ्याचदा गोंधळात पाडतो. लैंगिकतेचा अर्थ फक्त लैंगिक संबंध/ सेक्स किंवा त्याविषयीचे व्यवहार, वागणं असा घेतलेला दिसतो. पण लैंगिकता ही अधिक व्यापक संकल्पना आहे. आपली स्व–कल्पना, नाती, व्यक्त होण्याची पद्धत, आपले आयुष्याविषयीचे निर्णय हे सर्वच आणि याहूनही अधिक खूप!

लैंगिकता समजून घेताना…

लैंगिकता म्हणजे नक्की काय हा प्रश्न बऱ्याचदा गोंधळात पाडतो. लैंगिकतेचा अर्थ फक्त लैंगिक संबंध/ सेक्स किंवा त्याविषयीचे व्यवहार, वागणं असा घेतलेला दिसतो. पण लैंगिकता ही अधिक व्यापक संकल्पना आहे. आपली स्व–कल्पना, नाती, व्यक्त होण्याची पद्धत, आपले आयुष्याविषयीचे निर्णय हे सर्वच आणि याहूनही अधिक खूप!

आपले शरीर

मानवी शरीररचना, वयात येताना शरीरात होणारे बदल, मासिकपाळी, हस्तमैथुन, त्यासंदर्भातील समज- गैरसमज

पुढे वाचा

नातेसंबंध

नातेसंबंधामधील महत्त्वाची मूल्ये, नात्यांमधील दबाव व बंधने, प्रेम, आकर्षण, मैत्री, ब्रेक अप, पॅच अप.

पुढे वाचा

लैंगिक आरोग्य

एच आय व्ही व इतर लिंगसांसर्गिक आजार (STI’s), प्रजनन मार्गाशी निगडीत आजार, लैंगिक समस्या.

पुढे वाचा

प्रजनन आणि गर्भनिरोधन

गर्भधारणा कशी होते, गर्भनिरोधनाची विविध साधने, गर्भसमाप्ती (Abortion).

पुढे वाचा

लिंगभाव व लैंगिक ओळख

पुरुष किंवा स्त्री असणे म्हणजे काय?, LGBTQAI+, समलिंगी संबंध म्हणजे काय? विविध लैंगिक अभिव्यक्ती (sexual expressions).

पुढे वाचा

लैंगिकता आणि हिंसा

शारीरिक, मानसिक व लैंगिक शोषण किंवा हिंसा, विवाहांतर्गत शारीरिक जबरदस्ती, बाल-लैंगिक शोषण.

पुढे वाचा

लैंगिकता व मानसिक आरोग्य

लैंगिक समस्यांशी निगडीत मानसिक ताण तणाव, नैराश्य, चिंता, सेल्फ हार्म.

पुढे वाचा

अपंगत्व आणि लैंगिकता

विविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे लैंगिक आरोग्य, अभिव्यक्ती, हिंसा, सुरक्षितता व अधिकार, पालकांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन.

पुढे वाचा

लैंगिकता व कायदा

लैंगिकता व त्यासंदर्भातील विविध कायदे (पोक्सो, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, इ.), लैंगिक अधिकार.

पुढे वाचा

लैंगिकता व इंटरनेट

पोर्नोग्राफी, डेटींग अ‍ॅप, सायबर स्टॉकिंग, ऑनलाइन अ‍ब्युज.

पुढे वाचा

लैंगिकता व संस्कृती

प्राचीन काळापासून लैंगिकतेबद्दलच्या कल्पना, रुपके, मिथके कशी बदलत गेली यासंदर्भातील काही पुरातन कथा व विश्लेषण.

पुढे वाचा

व्हिडिओ

अमेझ व्हिडिओ

पॉडकास्ट

अमिला विचारा

शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का? पण कोणाला विचारू? अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील? लैंगिकतेविषयीच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. ह्या विषयाबद्दल फारसे बोलले जात नाही. पण या विषयाबद्दलच्या मोकळ्या सवांदाने व योग्य माहितीने बरेच प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ अमिला सांगा. अमि एक बॉट असून तुम्ही अमिला लैंगिक आरोग्य, मैत्री, प्रेम, नातेसंबंध आणि अशा बर्‍याच विषयांबद्दल प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जे वाटतंय् ते मोकळेपणाने अमिला विचारा. अमि त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. लैंगिकतेविषयी फारसे बोलले जात नसल्यामुळे त्यासंदर्भातील प्रश्न विचारताना वापरले जाणारे शब्द हे बहुतेक वेळा बोली भाषेतील किंवा शिव्यांमध्ये वापरले गेलेले असतात. पण अमिला ते शब्द कळणार नाहित व त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे आम्ही इथे एक लिंक देत आहोत ज्यात बोलीभाषेतील शब्दांना काही पर्यायी शब्द दिलेले आहेत जे तुम्ही अमिला तुमचा प्रश्न विचारताना वापरु शकता. जेणेकरुन अमिला तुमचा प्रश्न कळेल व त्याचे नेमके उत्तर देता येइल.

महत्वाचे प्रश्न

अशा परिस्थितीत गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. असुरक्षित लैंगिक संबंध येऊ नयेत यासाठी खरं तर आग्रही असायला हवे. गर्भधारणा जेव्हा नको असते तेव्हा विश्वासार्ह गर्भनिरोधन पद्धतीचाच अवलंब करायला हवा. आय पिल, अनवाँटेड ७२ सारख्या गोळ्या इमर्जन्सी मध्ये वापरायचे गर्भनिरोधक आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा https://letstalksexuality.com/contraception/

ही एक चुकीची धारणा आहे, कॉन्डोम वापरल्याने शरीरसंबंधांची भावना कमी होत नाही, कॉन्डोम वापरल्याने गर्भधारणेची व लिंगसांसर्गिक आजारांच्या संसर्गाचीही शक्यता राहत नाही.

तुम्हाला पॉर्न पाहण्याची सवय असणे व त्याचे व्यसन असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पोर्न बघण्यामुळे जर तुमच्या दैनंदिन आयुष्यावर किंवा नातेसंबंधांवर परिणाम होत असेल तर कोणा तज्ञ व्यक्तीशी/समुपदेशकाशी बोलायला हवे.

कितीवेळा हस्तमैथुन करावे याचे काही प्रमाण नाही.   हस्तमैथुन करणे हे सामान्य व नैसर्गिक आहे. हस्तमैथुन करणे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे. कुठल्याही जेण्डरच्या व्यक्तीने (स्त्री/पुरुष/ट्रान्सजेण्डर अथवा कुणीही)  हस्तमैथुन करणे ह्यात काहीच वावगे नाही. त्याचा आरोग्यावरती कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.

लोक याबद्दल देखील विचारतात

काही वेळा एखादा प्रश्न/शंका नेमक्या शब्दांमध्ये मांडता येत नाही किंवा इतरांनी विचारलेले प्रश्न आपल्याला कधी पडलेले नसतात व त्यांची उत्तरेही आपल्याला माहित नसतात. काही वेळेस प्रश्न पडलेले असतात पण विचारायला संकोच वाटतो. काही मित्र-मैत्रिणिंनी आम्हाला विचारलेले प्रश्न व आम्ही दिलेली उत्तरे तुम्हाला इथे वाचता येतील.

तुम्ही सांगताय हे काळजी करण्यासारखे आहे. कधी कधी काही व्यक्तिंंना असे स्पॉटिंग होऊ शकते. तरीही तुम्ही तत्काळ डॉक्टरांना भेटा.  खूप रक्तस्त्राव होत आहे म्हणुनही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. आणि जर आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे.

स्वतःच स्वत:सोबत लैंगिक सुख अनुभवण्यासाठी हस्तमैथून हा सर्वात सोपा मार्ग आहे. स्त्रीच्या शरीरात क्लिटोरिस नावाचा अतिशय संवेदनशील अवयव असतो. तो पूर्ण योनीमध्ये सामावलेला असतो. त्याचं टोक आणि योनीच्या आसपासची त्वचा लैंगिकदृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील असते, त्यामुळे तिला सहज स्पर्श झाला तरी ती ताठरते. तसेच स्तन हादेखील लैंगिक आनंद मिळणारा एक महत्वाचा अवयव आहे. आपण आपल्या शरीराला, लैंगिक अवयवांना हळूवारपणे हाताळल्यास, कुरवाळल्यास लैंगिक आनंद मिळू शकतो यालाच हस्तमैथुन असे म्हणतात. पुरुष व स्त्रिया दोघांसाठी हस्तमैथून करण्यासाठी बरीच साधनं उपलब्ध आहेत. स्त्रियांसाठी बनवलेल्या साधनांमध्ये dildo, व्हायब्रेटर अशी काही साधनं आहेत. भारतामध्ये अशा साधनांना विक्रिला ठेवायला बंदी आहे, तरीदेखील ऑनलाईन अशी उत्पादनं मागवता येतात.

हस्तमैथुन करताना किंवा करून झाल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता पाळणे. स्त्रिया किंवा पुरुष उद्दीपित झाल्यानंतर, लैंगिक अवयवांमधून स्त्राव पाझरतात त्यामुळे लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणे खूप जरुरी असते. याशिवाय फळभाज्या वा लिंगाच्या आकाराच्या वस्तू हस्तमैथुनासाठी वापरणे धोकादायक ठरु शकते. शक्यतो कोणत्याही धारधार, तीक्ष्ण, खरबरीत वस्तूंचा वापर करणेही टाळावे.

प्रेमात पडणं हे अगदीच स्वाभाविक आहे. त्यामुळे एक म्हणजे चिंता नको. आता सांगायचं कसं? असं म्हणतात पूर्वी लोक कबुतरासोबत चिठ्ठी पाठवायचे. आता तशी काही सोय नाही. पण आता मोबाईल, इंटरनेटच्या जगात अनेक मार्ग निघालेत तुमच्या भावना व्यक्त करण्याचे. त्यातला तुम्हाला आवडणारा आणि तिला हिंसक, त्रासदायक नसणारा मार्ग निवडा. शक्यतो भेटून सांगू शकलात तर जास्त चांगलं. आपलं म्हणणं जास्त चांगल्याप्रकारे पोहचवता येतं.

सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जी मैत्रीण आवडते तिलाही जर तुम्ही आवडत असाल तर आणि तरच पुढे जा. कसलीही जबरदस्ती नको. तिच्या मताचा आदर करा.

आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

letstalksexuality.com@gmail.com



    आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

    letstalksexuality.com@gmail.com



      पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

      वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी