तुमच्या प्रश्नांना उत्तर – Ask Prayas
शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन… “हे विचारू का? पण कोणाला विचारू?”
लैंगिकतेसारख्या विषयांबद्दल प्रश्न मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. पण बर्याचदा “लोक काय म्हणतील?” असं वाटून आपण गप्प बसतो. खरं तर, योग्य माहिती आणि मोकळ्या संवादातूनच या शंका दूर होऊ शकतात. आणि त्यासाठीच आहे – Ask Prayas!
मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ Ask Prayas ला सांगा. तुम्ही लैंगिक आरोग्य, मैत्री, प्रेम, नातेसंबंध अशा बर्याच विषयांबद्दल प्रश्न विचारू शकता. Ask Prayas त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हा खास चॅट असिस्टंट WhatsApp वर उपलब्ध आहे. त्यामुळे मनात आलेला प्रश्न कधीही, कुठेही आणि अगदी गोपनीयपणे विचारता येईल.
Ask Prayas मध्ये तुम्हाला मिळेल विश्वासार्ह आणि अचूक माहिती, तुमच्या भाषेत सन्मानपूर्वक उत्तरं आणि उत्तरांबरोबर अधिक माहितीसाठी सोपे, मजेदार आणि समजण्यासारखे व्हिडिओज किंवा लेख! योग्य माहिती मिळाली की आरोग्याबद्दलचे निर्णय घेणं खूपच सोपं होतं.
म्हणून कोणताही संकोच न बाळगता बिनधास्त विचारा…

