प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे. मासिक पाळीचा कालावधी जसा वेगळा असतो तसा रक्ताचा फ्लो देखील वेगळा असू शकतो. रक्तस्त्राव कमी असण्याची कारणं जनुकीय देखील असू शकतात. जसं आईला देखील पाळी काळात रक्तस्त्राव कमी होत असेल तर मुलीलादेखील कमी रक्तस्त्राव होऊ शकतो. पहिल्या मासिक पाळीनंतर पुढच्या काही मासिक पाळींमध्ये रक्तप्रवाहात थोडेफार बदल दिसू शकतात. किंवा रजोनिवृत्तीच्या शेवटाच्या टप्प्यातदेखील असे बदल होताना दिसतात. परंतू यात चिंता करण्यासारखं काही नाही. कदाचित गर्भनिरोधनाच्या तोडांवाटे घ्यायच्या गोळ्यांमुळं असे दिसू शकतात. कारण तोडांवाटे घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळं हार्मोनल बदल होण्याची शक्यता असते. अशा गोळ्यांचा वापर शक्यतो टाळावा.
जर नियमित मासिक पाळीमध्ये अचानक रक्तप्रवाह कमी झाला आहे असं जाणवलं तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.