प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलग्नानंतर मुल होण्यास दोन तीन वर्षाचा प्लॅनिंग करण्यासाठी काय करावे व कधी करावे?

1 उत्तर

मूल होऊ नये यासाठी स्त्री आणि पुरुषांनी वापरण्याची अनेक गर्भनिरोधक साधने उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर केल्याने गर्भधारणा टाळता येऊ शकते. पुरुषांसाठीचा निरोध हे सर्वात सुरक्षित व सोपे गर्भनिरोधक आहे. निरोध वापरल्याने पुरुषाच्या आणि स्त्रीच्या शरीरावर कसलेही वाईट परिणाम होत नाहीत किंवा लैंगिक संबंधांमध्ये बाधा येत नाही. निरोध वापरणं सोपं आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये निरोध मोफत मिळतो. स्त्रियांनी वापरण्याच्या गर्भनिरोधकांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि कॉपर टी किंवा तांबीसारख्या अडथळा पद्धती आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये कृत्रिम संप्रेरकांचा वापर केलेला असतो ज्यामुळे अंडोत्सर्जन होत नाही आणि त्यामुळे अर्थातच गर्भधारणा होत नाही. मात्र या गोळ्या वापरताना स्त्रीच्या शरीरावर काही ना काही परिणाम होतात, त्याची योग्य माहिती डॉक्टरांकडून घेतल्यानंतरच गोळ्या वापरण्याचा निर्णय घ्यावा. सलग 6 महिन्यांहून अधिक काळ गोळ्या वापरू नयेत. दर सहा महिन्यांनी गोळ्या घेणं थांबवून मासिक पाळी वेळेवर येते आहे ना याची खात्री करावी. जास्तीत जास्त एक ते दोन वर्ष गोळ्यांचा वापर करता येईल. अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचा –  https://letstalksexuality.com/contraception गर्भधारणा नक्की कशी आणि कधी होते हे समजून घेतलं तर जननक्षम म्हणजेच गर्भधारणा होऊ शकणारा काळ ओळखता येतो आणि त्यानुसार त्या काळात निरोध आणि शुक्राणूनाशक गर्भनिरोधकांचा वापर करता येऊ शकतो. मात्र यासाठी शरीराची, जननचक्राची पक्की ओळख आणि एकमेकांचं सहकार्य आवश्यक आहे.  https://letstalksexuality.com/conception गर्भधारणा, जनन, गरोदरपण ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. गरोदरपण आणि बाळाचा जन्म किंवा बाळ नको असल्यास गर्भपात हे स्त्रियांनाच सहन करावे लागतात. त्यामुळे मूल नको असेल तर किमान निरोधसारखं गर्भनिरोधक वापरण्याची जबाबदारी तुमच्यासारखे समजूतदार जोडीदार घेतील अशी अपेक्षा आहे.  तुमचे विचार नक्की कळवा. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 5 =