sir,ya web site mule mla farach madat jhali so thank u…….body building ani mastrubation yacha kahi sabandh ahe ka mnanje body karnarya ne twice a week mastrubation kel tr chalel ?
आमच्या साईटचा तुम्हाला उपयोग होत आहे हे ऐकून छान वाटले. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. वेबसाईटसाठी तुमच्या इतर काही सूचना, प्रतिक्रिया, अनुभव असतील तर आम्हाला नक्की कळवा. आता वळूयात तुमच्या उत्तराकडे.
हस्तमैथुन आणि बॉडी बिल्डिंग याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. हस्तमैथुन किती वेळा करायचे याचा काही नियम नाही मात्र हस्तमैथुन सोडून दुसऱ्या कशातच आनंद मिळत नाही अशी स्थिती यायला नको.
याविषयीचा लेख वाचा. https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/