शौचाच्या(शीच्या) जागेतून म्हणजेच गुदामधून देखील संभोग करता येतो. स्त्री-पुरुष किंवा पुरुष-पुरुष या मैथुनाचा उपयोग करतात. याला गुदामैथुन असं म्हणतात.
लैंगिक संबंध समलिंगी असोत वा भिन्नलिंगी. ज्या व्यक्तींसोबत तुमचे लैंगिक संबंध येणार आहेत त्यांना जर एच. आय. व्ही. असेल आणि तुमचे त्यांच्यासोबत असुरक्षित (विना कंडोम ) लैंगिक संबंध आले तर एच. आय. व्ही. चा संसर्ग होऊ शकतो. समलिंगी असो किंवा विषमलिंगी कोणतेही जोखमीचे लैंगिक वर्तन एच. आय. व्ही. संसर्गाचा धोका वाढवते.
गुदमैथुनामुळे एच. आय. व्ही. संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो कारण त्यामध्ये जखमा होण्याची शक्यता असते. जखमांमुळे एच. आय.व्ही. विषाणूंचा प्रवेश अधिक सहजतेने होतो. म्हणून योनी मैथुनाच्या तुलनेत गुदमैथुन अधिक धोकादायक आहे. एच. आय. व्ही. आणि एड्स विषयी अधिक माहितीसाठी यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि वाचा.