प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMala swapn doshacha tras ahe mahenyatun 3-4 vela swwapndosh hoto tasa zalyan mala thakwa yeto kahihe karnyachi mansikta naste maza vajan pan vadhat nahe ani hospital madhe jawaw mhatla tar sex spcilist doctor pan milat nahe me kay karu ekhadya changlya sex specilistcha nav va asdress sanga

1 उत्तर

मुळात हा प्रॉब्लेमच नाही त्यामुळे त्याच्यावर उपचार घेण्याची देखील आवश्यकता नाही.

झोपेत वीर्यपतन होतं म्हणजे नक्की काय होतं हे समजून घेऊयात. एखादी व्यक्ती गाढ झोपेत असताना त्यांस कामोत्तेजक स्वप्न पडतात. अशा स्वप्नांमुळे लैंगिक उत्तेजना तयार होते आणि झोपेतच वीर्यपतन होते. याला स्वप्नावस्था असे म्हणतात. याला नाईट फॉल असंही म्हणतात. बोलीभाषेमध्ये याला जरी स्वप्नदोष म्हणत असले तरीही यात काहीही दोष नाही. लैंगिक संबंध असो, हस्तमैथुन असो वा स्वप्नावस्था यामुळे होणारे वीर्यपतन ही मानवाच्या लैंगिकतेशी निगडीत अगदी सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ते का बंद करायचे इथून सुरुवात आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास हे बंद करण्याची काहीही गरज नाही. मात्र यामुळे तुमच्या मनात तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात असे वाटत असेल, भीती वाटत असेल, अपराधी वाटत असेल तर या नकारात्मक भावना मात्र दूर करा. याविषयीचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/night-fall/

आपल्या वेबसाईट वर याविषयीचे आणि लैंगिकतेच्या इतर पैलूंविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 10 =