Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › masik pali niyamit yet nahi
masik pali niyamit yet nahi asked 9 years ago
0 Vote Up Vote Down

pali niymit yet nahi last april pasun pali niymit yet nahi 9 July ya tarkhes pali aali hoti pan aata aug 9 la pali ajun aali nahi aamhi prega news test keli pan result negative aala dr.ch sala ghetla tar te bole ki yeil jara wait kara late yeu shakte.
1 . pregnant aahe he kase olkhta yeil..??
krupya help karavi
 

1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for masik pali niyamit yet nahi answered 9 years ago

तुम्ही तुमचं वय कळवलं असतं तर अधिक नेमकेपणाने उत्तर देता आलं असतं. गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.

काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.

अधिक माहितीसाठी– https://letstalksexuality.commenstrual-and-fertilitycycle/  आणि https://letstalksexuality.commenstrual-cycle-length/  हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.

टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

प्रेगा टेस्ट करून गर्भधारणा आहे की नाही ते ठरवता येईल. प्रेगा टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली कधीही चांगले.

गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणेच योग्य ठरेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

13 + 8 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही