maze teen question asked 9 years ago

Maze teen question ahet

1)Mule(boys) zehva hasstamaithun kartata tehva tyanchya lingatun virya baher yete. Ani zehva muli(girls) hasstamaithun kartata tehva tyanch lingatun kay baher yete?

2)mulini(girls) hasstamaithun kase karave ani hasstamaithun kartana kay kalaji ghetali pahije?

3)sex kiva hasstamaithun kelavar kamzori janavate ka?

Thanks.

1 उत्तर
Answer for maze teen question answered 9 years ago

स्त्री आणि पुरुषांचे प्रजनन अवयव वेगवेगळे आहेत. यामध्ये पुरुषांना लिंग किंवा शिश्न तर स्त्रियांना योनी असते. दोघेही आपआपल्या लैंगिक अवयवांना हात लावून किंवा कुरवाळून हस्तमैथुन करू शकतात. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे टप्याटप्याने पाहू या..

सुरवातीला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर – मुलगे जेव्हा हस्तमैथून करतात तेव्हा त्यांच्या “लिंगातून (म्हणजेच शिश्नातून)” वीर्य बाहेर येतं. जेव्हा मुलींच्या लैंगिक भावना उद्दीपित होतात किंवा त्या हस्तमैथून करतात तेव्हा योनीच्या बाह्य पटलावरील ग्रंथी फुगतात व त्यामुळे एक विशिष्ट स्त्राव योनी मार्गातून येऊ लागतो जो समागमाच्या वेळी योनी मध्ये लिंग घालण्याच्या प्रक्रियेला सोपं बनवतो. हा स्त्राव येणं नैसर्गिक आहे. जीवशास्त्रीय दृष्ट्या या स्त्रावामध्ये शुक्राणू सोडून बाकी तेच घटक असतात जे वीर्यामध्ये असतात.
        
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर – पुरुष व स्त्रिया दोघांसाठी हस्तमैथून करण्यासाठी बरीच साधनं उपलब्ध असतात जी वैज्ञानिकदृष्ट्या बनवलेली असतात. स्त्रियांसाठी बनवलेल्या साधनांमध्ये dildo, व्हायब्रेटर अशी काही साधनं आहेत. भारतामध्ये अशा साधनांना बंदी आहे. त्यामुळे स्वतः लैंगिक सुख अनुभवण्यासाठी हस्तमैथून हा सर्वात सोपा मार्ग आहे. स्त्रीच्या शरीरात क्लिटोरिस नावाचा अतिशय संवेदनशील अवयव असतो. तो पूर्ण योनीमध्ये सामावलेला असतो. त्याचं टोक आणि योनीच्या आसपासची त्वचा लैंगिकदृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील असते, त्यामुळे तिला सहज स्पर्श झाला तरी ती ताठरते. तसेच स्तन हादेखील लैंगिक आनंद मिळणारा एक महत्वाचा अवयव आहे. आपण आपल्या शरीराला, लैंगिक अवयवांना हळूवारपणे हाताळल्यास, कुरवाळल्यास लैंगिक आनंद मिळू शकतो यालाच हस्तमैथुन असे म्हणतात. हस्तमैथून करताना किंवा करून झाल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता पाळणे. स्त्रिया किंवा पुरुष उद्दीपित झाल्यानंतर, लैंगिक अवयवांमधून पाझरणाऱ्या स्त्रावांमध्ये नंतर अनेक जीवाणू आणि बुरशी तयार होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणे खूप जरुरी असते. याशिवाय लैंगिक आनंद मिळण्यासाठी कोणत्याही धारधार, तीक्ष्ण, खरबरीत वस्तूंचा वापर करणे टाळावे.
अधिक वाचा इथे: माझं लैंगिक सुख माझ्या हातात – क्लिटोरिस
https://letstalksexuality.com/clitoris-and-orgasm-in-women/

तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर – सेक्स किंवा हस्तमैथून या क्रिया आपल्याला आनंद देणाऱ्या क्रिया आहेत. त्या नैसर्गिक क्रिया आहेत त्यामुळे सेक्स किंवा हस्तमैथूनामुळे कमजोरी येते हा एक गैरसमज आहे. उलटपक्षी हस्तमैथुनाचे अनेक फायदे आहेत. हस्तमैथुनामुळे आपल्याला स्वतःच्या शरीरातील संवेदनशील अवयव समजण्यास मदत होते, ज्याचा फायदा तुमचे भविष्यातील लैंगिक आयुष्य सुखकर बनवण्यासाठी होऊ शकतो शिवाय हस्तमैथून आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल छान भावना निर्माण करण्यास मदत करते त्यामुळे हस्तमैथूनाबद्दल असणाऱ्या अशा गैरसमजुतींचा विचार करण्यापेक्षा हस्तमैथुनाचा आनंद घेणे जास्त योग्य नाही का?    
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 15 =