प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSex kartana 2 minithacha aat pani galat

Maja lagnala 2 varsh zali pan maja navra sex karayla lagla ki 2 minithat pani galat jast vel chalanya sathi kay karayla lagel plz tell me sir

1 उत्तर

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन.असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.

शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/premature-ejaculation/ हा लेख तसेच आपल्या वेबसाईटवरील या समस्येसंबंधित प्रश्न उत्तरे नक्की वाचा.

संभोगाच्या काही पध्दती बदलून शीघ्रपतनाची समस्या दूर केली जाऊ शकते. याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 1 =