मला ब्लु फिल्म पाहण्याची खुप ईच्छा होते पण मला ते पाहण बंद करायच आहे त्यासाठी काय करू?
तुझ्या एकाच प्रश्ना दोन वेगवेगळे मुद्दे आले आहेत. पहिला मुद्दा ब्लू फिल्म/पॉर्नक्लिप बद्दलचा आणि दुसरा मुद्दा हस्तमैथुनाबद्दलचा. आधी आपण पहिल्या मुद्द्यावर बोलू या. ब्लू फिल्म किंवा पॉर्न क्लिप पाहणं चांगलं की वाईट हे प्रत्येकानं ठरवायचं असतं. बहुसंख्य पॉर्न क्लिपमध्ये हिंसा दाखवली जाते. याला कायद्याच्या भाषेत लैंगिक अत्याचार म्हणतात. काहीवेळेस ही हिंसा अमानवी असते. अशा हिंसेचं तू समर्थन करणार आहेस का? हा तुला विचार करण्याचा मुद्दा आहे. कदाचित सतत अशा हिंसा पाहिल्यामुळे जोडीदारासोबत अशी हिंसा करण्याची इच्छा तयार होवू शकते. शिवाय पॉर्न क्लिपमध्ये स्त्री-पुरुषांच्या अतिशय साचेबद्ध प्रतिमा दाखवलेल्या असतात. स्त्रीयांचे आणि पुरुषांचे लैंगिक अवयव कोणत्या मापाचे असावे? त्यानं काय होतं? याची अतिरंजित वर्णनं त्यात दाखवलेली असतात. त्यामुळं पॉर्न क्लिप पाहताना तू त्यातून केवळ लैंगिक उत्तेजनेचा आनंद घेतो की त्यातील गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो यावर तु विचार कर आणि पॉर्न क्लिप पहायच्या की नाही हे ठरव.
आता तुझ्या दुसर्या मुद्द्यावर बोलू या. हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. यामध्ये वाईट असं काही नाही. हस्त्मैथुन करताना टोकदार किंवा जखम होईल अशा गोष्टी वापरणं कटाक्षानं टाळावं. स्त्री आणि पुरुष हस्तमैथुन करताना बहुतेकवेळा मनामध्ये काहीतरी लैंगिक विचार, गोष्टी किंवा चित्र तयार करुनच हस्तमैथुन करतात. यामध्ये काहीही वाईट नाही. तू काय विचार करावा यावर कोणतही बंधन नाही. शिवाय हस्तमैथुनाचा कोणताही ठराविक कालावधी नाही. काही स्त्री-पुरुष मनामधील विचार, गोष्ट किंवा चित्र अनेकवेळ रंगवतात आणि हस्तमैथुन निवांत करतात तर काहीजण/जणी झटपट उरकतात.
शेवटी एवढंच की ब्लू फिल्म पाहून हस्तमैथुन करणं किंवा न करणं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. मात्र सतत मनामध्ये सेक्सबद्दल विचार येत असतील तर तुझ मन इतर कामांमध्ये गुंतव. छंद जोपास, मित्र-मैत्रीणींना भेट. दैंनदिन आयुष्यातील कामामध्ये लक्ष दे.