प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंग खालील रेषेवर चिटकलेली आहे विरय लवकर गळते

1 उत्तर

लिंग खालील रेषेवर चिकटले आहे म्हणजे तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे लक्षात येत नाही. यामुळे संबंध करताना काही त्रास होत असेल, वेदना होत असतील तर मात्र डॉक्टरांशी संपर्क साधा. याचा शीघ्रपतनाशी काही संबंध आहे का हेही त्यांना विचारा.

लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या. तुमच्या भागातील डॉक्टरांना/सेक्सॉलॉजिस्टला भेटा. पुरुषाच्या शरीराविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/male-body/

आता शीघ्रपतनाविषयी जाणून घेऊ यात. संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.

शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्या उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील शीघ्रपतन याविषयीचा लेख वाचा. खाली लिंक्स दिल्या आहेत.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 14 =