पुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय? हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट

व्हर्जिनिया जॉन्सन आणि विल्यम मास्टर्स या डॉक्टरांनी सुचविलेला उपाय

25,906

माझ्या पुरुष मित्रांनो,

आमची ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही हजारो प्रश्न आम्हाला आले त्यातील अंदाजे ३०% प्रश्न, हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन. अर्थात यातील बहुतेक प्रश्न पुरुषांनी विचारले आहेत याचा अंदाज आपणा सुजाण वाचकांना आला असेलच. त्यांना यथोचित उतरंही आम्ही दिली आहेत व देत आहोत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींशी संबंधित ‘समस्यांचं’ निराकरण करण्याचा पुरेसा प्रयत्न वेबसाईट वर झालेला आहे. इच्छुक वाचक हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं वेबसाईटवर वाचू शकतात. अर्थात आजही असेच अनेक प्रश्न परत येतच आहेत.

प्रस्तुत लेखात शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे. आशा आहे तुम्हाला हा लेख उपयोगी वाटेल. हा लेख बिंदुमाधव खिरे लिखित ‘मानवी लैंगिकता – एक प्राथमिक ओळख’ या पुस्तकातील माहितीवर पूर्णपणे आधारित आहे. मानवी लैंगिकतेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर नेमकी आणि शास्त्रीय माहिती देणारे हे पुस्तक सर्वांच्याच संग्रहात असायला हवे.

स्टार्ट स्टॉप स्टार्ट

एक ताई म्हणाल्या ‘हे फिल्डिंग लावतात, बॅटिंगला उभे राहतात पण विकेट लगेच पडते.’ लैंगिक प्रश्नांमध्ये सर्वात मोठा प्रश्न जो अनेक पुरुषांना भेडसावतो, तो म्हणजे शीघ्र वीर्यपतन. काहींना याची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी खालील मार्गांचा वापर केला जातो. यातल्या स्टार्ट-स्टॉप-स्टार्ट पद्धतीचा शास्त्रोक्त वापर करून अनेकांना चांगला फरक पडलेला दिसतो.

लैंगिकतेवर काम करणाऱ्या ‘मास्टर्स अँड जॉन्सन’ या डॉक्टरांनी हा मार्ग सुचविला आहे. त्यात थोडा बदल करून ही पद्धत इथे दिली आहे. हा मार्ग सोपा असला तरी तो मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्यानं करावा. पहिल्या टप्प्यानंतर सर्व टप्प्यांसाठी जोडीदाराची गरज लागते.

पहिला आठवडा – हस्तमैथुन करायला लागायचं पण वीर्यपतन होऊ द्यायचं नाही. वीर्यपतन व्हायची वेळ आली की इतर कोणते तरी (अध्यात्मिक?) विचार करून लिंगाचा ताठरपणा घालवून द्यायचा. परत लैंगिक इच्छा आणून लिंग उत्तेजित करायचं व परत हीच क्रिया करायची. असं दररोज झोपायच्या अगोदर तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन करून किंवा संभोग करून वीर्यपतन करायचं नाही. या टप्प्यात हळूहळू पुरुषाने त्याच्या वीर्यपतनावरचं नियंत्रण सुटण्याचा बिंदू ओळखायला लागायचं. कोणत्या क्षणानंतर आपला संयम सुटणार हे त्याने व्यवस्थित ओळखायला शिकावं.
दुसरा आठवडा – जोडीदाराने शीघ्रपतन होणाऱ्या व्यक्तीला हस्तमैथुन करण्यास सहाय्य करावं. जसा वीर्य पतनाचा क्षण जवळ तसा पुरुषाने जोडीदाराला थांबवावं. थोडा अवधी जाऊ द्यावा आणि लिंग शिथिल झालं की परत लैंगिक इच्छा आणून लिंग उत्तेजित करावं व परत हीच प्रक्रिया करावी. असं दररोज तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन/संभोगातून वीर्यपतन होऊ द्यायचं नाही.
तिसरा आठवडा – पुरुषाने पाठीवर झोपायचं. लैंगिक उत्तेजना येऊन लिंग उत्तेजित झालं की जोडीदाराने आपल्या योनीचा स्पर्श लिंगाला करावा. जर वीर्यपतन होतंय असं वाटलं तर त्या क्षणी तिथेच विराम घ्यावा. हळूहळू लिंगाचा योनी प्रवेश करवून या स्थितीत काही वेळ जावू द्यावा. लिंग शिथिल होऊ द्यावे आणि परत लिंग उत्तेजित करून योनी प्रवेशी स्थितीत यावे पण नंतर कुठलीही हालचाल करू नये. हीच स्थिती १० ते १५ मिनिटे कायम ठेवावी. असं दररोज झोपायच्या अगोदर तीन वेळा करावं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन/संभोगातून वीर्यपतन होऊ द्यायचं नाही.
चौथा आठवडा – वरील टप्प्यात एक बदल करायचा. आता लिंगाला योनीप्रवेशी स्थितीत काही मिनिटं तरी राहण्याची सवय झालेली असते. या टप्प्यात स्त्री जोडीदाराने लिंगाचा योनीप्रवेश झाल्यानंतर हळूहळू खाली वर अशी हालचाल करायची. वीर्यपतन होतंय असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी पुरुष जोडीदाराने ही हालचाल थांबवावी. वीर्य पतनाची भावना गेल्यानंतर परत हालचाल पूर्ववत करावी. असं १० मिनिटे दररोज पुढचा एक आठवडा करायचं. या टप्प्यात पुरुषाचा संभोग कालावधी वाढलेला दिसतो.
पाचवा आठवडा – स्त्रीने पाठीवर झोपायचं. पुरुषाने उत्तेजित लिंगाचा योनी प्रवेश करावा. जर वीर्यपतन होतंय असं जाणवलं तर अल्प विराम घ्यावा आणि वीर्यपतनाची भावना गेल्यानंतर परत लिंग आत घालण्याचा प्रयत्न करावा. लिंग योनीत असताना हळूहळू हालचाल करावी. वीर्यपतन होतंय असं जाणवलं तर परत थोडा वेळ थांबावे. वीर्यपतनाची इच्छा गेल्यानंतर परत ‘स्ट्रोक’ सुरु करायचे.
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी 
१. सबुरी हवी. घाई घाईत पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करू नका.
२. काही वेळा एक टप्पा पार करताना अपयश येतं. याचा अर्थ पूर्वीच्या टप्प्यात अजून सुधारणा हवी. इथं दिलेला ‘एक आठवडा’ असा प्रत्येक टप्प्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो.
३. संभोगाचा कालावधी वाढला की काही महिने/वर्षानंतर काही जणांचं परत लवकर वीर्यपतन सुरु होतं. अशा वेळी परत वरील टप्प्यांचा वापर करून संभोगाचा कालावधी वाढवायचा प्रयत्न करावा.
इतर काही पद्धती 
१. डबल निरोधचा वापर – निरोध वापरून संवेदनशीलता कमी होते म्हणून काहीजण डबल निरोध वापरून संभोगाचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करून बघतात.
२.ऍनेस्थेटीक  जेली – काहीजण संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी ऍनेस्थेटीक जेली लिंगाला लावून लिंग काही अंशी बधिर करून संभोग करतात. या रसायनामुळे संभोगाचा कालावधी वाढू शकतो. पण लिंगाची संवेदनशीलता कमी होते व संभोगातून कमी सुख मिळतं. अशा प्रकारचं रसायन निरोधाच्या वंगणात वापरून संभोगाचा कालावधी वाढवणारे निरोध बनवले जातात. या ‘एक्स्ट्रा टाईम’ निरोधाच्या वंगणात अशा तर्हेचं ऍनेस्थेटीक  रसायन मिसळलेलं असतं.
३.मानसिक आजारांवरील औषधं – क्लायंटचा संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी काही मानसोपचारतज्ज्ञ मानसिक आजारांवरील औषधांचा वापर करतात. लवकर वीर्यपतन न होणं हा काही औषधांचा ‘साईड इफेक्ट’ असतो. काही जणांना याचा फायदा होतो.

संदर्भ: ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातील काही भाग ( सदर पुस्तक रसिक साहित्य किंंवा  साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, वा  मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे इथे  विक्रीसाठी उपलब्ध).

शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…

 

27 Comments
 1. vijay.Waghmare says

  सप्नदोष , श्रीक्रपतन , लिंग लहान, मी 17 वर्षाचा मुलगा आहे तरी पण माझी लिंग लहान आहे, काय करच सर

  1. I सोच says

   मित्रा तुझ्या प्रश्नामध्ये तीन उपप्रश्न आहेत. एकाएका विषयी बोलू यात.
   १. स्वप्नदोष/स्वप्नावस्था
   लैंगिक इच्छा होणं, हस्तमैथुन करणं आणि स्वप्नावस्था या तिन्हीही गोष्टी अगदी नैसर्गिक आहेत. यात काहीही गैर नाही आणि यामुळे काही प्रॉब्लेम पण होत नाही. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/night-fall/

   २. शीघ्रपतन
   संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.
   शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.
   शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.
   वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.
   अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील शिघ्रपतान विषयीचा लेख वाचा. खाली लिंक्स दिल्या आहेत.
   https://letstalksexuality.com/premature-ejaculation
   https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

   आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. वेबसाईटवरील ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
   ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/
   ३. लहान लिंग
   प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे. लिंगाचा आकार वाढविण्यासाठी शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झालेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. असे औषध देतो असे सांगून कोणी भोंदू, बाबा, झोलाझाप डॉक्टर तुमची फसवणूक करत असेल तर सावध असा. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

   1. Rj says

    सर माझ लिंग डाव्या बाजूला खूप झुकते आणि त्याचा मला sex करतांना त्रास होईल ka

    1. lets talk sexuality says

     नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही तसेच गर्भधारणा होण्यासाठीही काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना झाल्या तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो. बाकामुळे / वाकडेपणामुळे भविष्यात लैंगिक संबंधांच्या वेळी अडचण येत असेल किंवा वेदना जाणवल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे कारण नाही.

     आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरील लेख आणि ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

     पुरुषाचं शरीर :- https://letstalksexuality.com/male-body/

     प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

     https://letstalksexuality.com/question/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D/

     तुमच्या कमेंट चे स्वागतच आहे,पण पुढील वेळी इथे प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर जाऊन प्रश्न विचारा.

 2. samir says

  माझा मित्र एक स्त्री ला संबोग करतो आनी त्या स्त्री च नवरा पण सं भोग करतो तर माझ्या मित्राला HIV होईल का

 3. kishor says

  माझा मित्र एक स्त्री ला संबोग करतो आनी त्या स्त्री च नवरा पण सं भोग करतो तर माझ्या मित्राला HIV होईल का

 4. Kandu says

  मी तुमच्या ह्या website ची माहिती आवडीने वाचतो, आणि ह्यातून खूप माहिती मिळते. सेक्स बद्दल आपल्या मनात जे कुविचार आहेत आणि सकारात्मकता ह्यांचा खूप चांगल्या पद्धतीतीने तुम्ही सर्वाना ह्या website द्वारा सेक्स बद्दल चांगल्या गोष्टी तुम्ही मांडिले आहेत. त्या बद्दल तुमचे मन: पूर्वक आभार व्यक्त करतो.
  पण एका गोष्टीची क्षमा असावी, मी तुमचा हा शीघ्रपतनची माहिती वाचली, त्यावर उपायहि वाचला आणि मला ते आवडलेही. पण त्या मध्ये एक गोस्ट मला जरा खुपली कि शीघ्रपतना मध्ये अध्यात्मिक ह्या गोष्टीचा उल्लेख इथे उपायास एक एखादी हिंट अथवा मन वळवण्यासाटी एखाधा सोयीस्कर उपाय म्हणून उल्लेख केला आहे.
  पण क्षमा असावी, अध्यात्मिकता आणि कामुकता हे दोन्ही भिन्न आहेत. जिथे अध्यात्मिकता असते तिथे कामुकता वास करत नाही. भौतिक गोष्टी आणि अध्यात्मिक गोष्टी ह्या दोघांचे हि रूप वेगळे आहेत. वासना जेव्हा निर्माण होते तेव्हा कामुक वृत्ती मनात खेळतात आणि त्या वेळेस फक्त त्याचा उपभोग कसा आणि तो निरंतर किती वेळ संभोग अथवा हस्तमैथुन करताना आनंद घ्यावा ह्यामध्ये आपण रमून जातो आणि हे नैसर्गिक आहे ह्यात काही वावगं नाही. पण सहज उपाय आणि सोयीस्कर उपाय म्हणून आपण अध्यात्मिक कडे वळून अध्यात्मिकतेला कळ अथवा कामुकतेला अध्यात्मिकतेने ह्रास करणे हे थोडं वावगं वाटत. कारण आध्यात्मिकता हि फक्त भक्ती भावातून निर्माण होते आणि भक्ती भाव हा नाम संकीर्तन अथवा देवाची, रंजले गांजले आहेत त्यांची सेवा करणे ह्यातून उत्पन्न होतो.
  जेव्हा कामुक स्तिथीत रममाण असतो तेव्हा भक्तीभाव नर्माण नाही होऊ शकत आणि जिथे भक्ती भाव नाही तिथे अध्यात्मिक नाही आणि अध्यात्मिक निर्माण झाली कि कामुक वृत्तीचा ह्रास होतो. फक्त उपाय म्हणून तात्पुरता आध्यत्मिकते कडे वळणे हे चुकीचे आहे कारण अध्यात्मिकतेकडे वळण घेतलेला व्यक्ती स्रावांगीण आत्म्याचा विकास करतो आणि मोक्ष ह्या गोष्टीला प्राप्त करण्यास उत्सूक असतो. तुमची हि website हि सर्वजण सेक्स बद्दल उचित माहिती आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचतात. तुम्ही कृपया (आध्यात्मिक) शब्दाचा चुकीचा शब्दप्रयोग करून ह्याला विटंबना करू नका. तुमच्या website चा सर्वानाच आदर आहे.
  मी ह्या गोष्टीवर एकाच सुचविणे कि हस्तमैथुन / संभोग करताना आपण इतर काही सोयीस्कर पद्धत (इतर काही गोष्टींनी मन वळवणे) अमलात आणू शकतो. हे तर त्या व्यक्तीवर अवलंबून आहे कि अशी कोणती गोष्ट आहे ज्याने त्याचे मन काही वेळेस त्याला संयम ठेवू शकते किंवा कामुक गोष्टी करताना त्याला काही वेळेस परावृत्त करू शकते. जेणे करून आपली मनोवृत्ती ह्या दोन्ही गोष्टीत (कामुक आणि अध्यात्मिक) सक्रिय राहतील.
  मी एक साधारण व्यक्ती म्हणून लेख वाचून आपणास अभिप्राय दिला आहे. माझा तुमच्या website ला कोणताच विरॊध नाही. मला फक्त हेच सांगायचं आहे कि शब्दांच उल्लेख / मांडणी करताना कृपया आपण दक्षता घ्यावी जेणेकरून लोकांना ते आत्मसात / उपयोगात आणताना त्याचा फायदा होईल.
  काही चुकून माझ्या कडून चुकीचा अभिप्राय वाटत असल्यास क्षमा असावी.

 5. बालाजी says

  सर मी केव्हा पण सेक्स करतो माजा वीर्य 1 मिनिटात बाहेर येतो अस का खुप वेळा केलो तस च होतंय

  1. lets talk sexuality says

   शीघ्रपतन होण्यामागे बरीच कारणं असतात(अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा https://letstalksexuality.com/premature-ejaculation/), तुमची नक्की काय समस्या आहे, हे तुम्हाला आधी समजावून घ्यावं लागेल, त्यामागची कारणं शोधावी लागतील.
   शीघ्रपतनाच्या समस्येवर बरेच उपाय आहेत, पण ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणे गरजेचे असतात. तेव्हा एखाद्या डॉक्टरांना अवश्य भेटा.
   पुढील वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर विचारावा.

 6. Shubham says

  Sir mi ling yonit taklyavar lagech maze virya patan hote… Kay karu

  1. lets talk sexuality says

   वर दिलेले उपाय एकदा करुन पहा, जर हे प्रयोग काम करत नसतील तर मात्र लैंगिक तज्ञांंचे मार्गदर्शन घ्या.

 7. Dost hidden says

  पत्नीला प्रणय क्रीडा कमी आवडते किवा आवडत नाही
  Ti kiss देत नाही तिला ते आवडत नाही पण माझी खूप ईच्छा असते kiss साठी काय करू

  ती कमी उत्तेजित झाल्यामुळे मी 3ते 5मिनिटे sex करून सुद्धा ती slakhit hot नाही आमचे timing miss match होते मी चरण सीमेवर असताना तिला स्पीड हवे असते अणि मी te देवू शकत नाही mi slakhit होतो मला शीघ्र पतनाcha त्रास aahe ka?

  तिच समाधान करण्यासाठी स्पीड वाढवत गेलो tar मी आधी slakhit होतो ती तशीच राहते kay उपाय करू

  Ani तीलाsex chi ईच्छा खूप कमी असते तिची ईच्छा कशी वाढवू
  प्रणय n करता तीला डायरेक्ट आत प्रवेश hava असतो ज्यामुळे जास्त वेळ करून सुद्धा मीच मागे पडतो उपाय सांगा plz

  1. let's talk sexuality says

   तुम्हाला किस करावा वाटतो हे ठिक आहे, पण तुमच्या पत्नीची इच्छा/ संमती ही तितकीच महत्वाची आहे. तुम्ही तिला यासाठी मनवू शकता पण जबरदस्ती नाही. तुम्ही वेळेचं बोलत आहात, तसेच तिची इच्छा कमी असते, यासाठी तुम्ही फोरप्ले का करत नाही? त्यासाठी सोबतची लिंक पहा https://letstalksexuality.com/foreplay/ .

   तुम्हाला शिघ्रपतन आहे की नाही हे तुम्हाला पहावे लागेल, त्यासाठी सोबतच्या लिंक पहा त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
   https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

   व त्यावर काय उपाय करता येतील यासाठी वरील लेख पुन्हा वाचा वा सोबतची लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

   तुमची समस्या ही तुमची एकट्याची नाही आहे, खूप सा-या पुरुषांची आहे. तेव्हा घाबरु नका, लाजू नका. वरील लिंक पहा व आयुष्याची मजा वाढवा. शुभेच्छा !

 8. संकेश राऊत says

  मला आटत कधी कधी लिंग ताठ होत नाही असे दोन तीन वेळा झाले इतर वेळेला सेक्स ची पूर्ण मज्जा आम्ही दोघे पण घेता सहा महिन्या अगोदर माझे अनैतिक संबंध होते ते मिसेस ला सांगितले व त्यातून वाद निर्माण झाला आता ही माझी मैत्रीण जी माझी मैत्रीण आहे तिच्याशी एकदा सेक्स झाले आहे तिच्याशी बोलताना किंवा ती समोर दिसली तर लगेच ताठ होते मग मिसेस समोर असताना का ताठ होत नाही? कृपया करण सांगा?

  1. let's talk sexuality says

   असं का झालं याचंं कारण तुम्हालाच शोधावं लागेल. तरीही काही शक्यता आम्ही वर्तवत आहोत.
   तुम्ही सांगत आहात त्यानूसार तुमच्या व तुमच्या पत्नीमध्ये वाद झाल्यामुळे जो मानसिक ताण असेल त्यामुळे लिंगाला ताठरता येत नसावी. तुम्ही तुमच्या पत्नीसमोर नर्व्हस होता का?
   अन तुमच्या मनामध्ये मैत्रिणीबाबतची भावना तशीच पूर्वीसारखी असावी त्यामुळे तिथे काहीच अडचण वाटत नसावी.

   शक्य झाल्यास पत्नीशी मोकळेपणाने बोला, तुमचं नातं पूर्वी सारखं होण्यासाठी प्रयत्न करा. समुपदेशकांना भेटण्याची गरज भासल्यास भेटून घ्याल.

 9. फुलाजी माने says

  सर माझं सेक्स करताना सगळ्या गोष्टी बरोबर होतात पण वीर्य लवकर बाहेर येत नाही
  खूप वेळ लागतो त्याला बाहेर येण्यासाठी अस का होत?

  1. let's talk sexuality says

   याचा तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला काही त्रास होतो का? तसे नसेल तर त्यात काही वावगे नाही. तुम्ही किंवा तुमची जोडीदार तुम्हाला समाधान मिळण्यासाठी आणखीही काही मार्ग शोधू शकता. उदा. हस्तमैथुन.
   जर त्रास होत असेल आणि तुमचे सहसा स्खलन होत नसेल तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील किंवा योग्य त्या डॉक्टरांकडे (सेक्सॉलॉजिस्ट) पाठवतील.

   खरे पाहता ही एक खूप दुर्मिळ स्थिती आहे. बहुतेक पुरुषांची शिघ्र पतनाची समस्या असते. पण वीर्य स्खलनच होत नाही हे सामान्य नाही. याला डिलेड अथवा रीटार्डेड इजाक्युलेशन म्हणतात. याला अनेक कारणं असू शकतात. उदा. तुम्ही काही विशिष्ट प्रकारची औषधे घेत असाल तर त्याचा हा परिणाम असू शकतो. दुसरे म्हणजे वयोमानापरत्वे लिंगातील नसांमध्ये संवेदनशीलता कमी होऊन शिथिलता येते. लिंग पुरेसे ताठर होत नसेल तरीसुद्धा स्खलनात अडथळा येऊ शकतो. एखाद्या ऑपरेशन दरम्यान नसेला इजा पोचणे, दारूचे सेवन, ग्रंथीमधील बिघाड, पुरेशी झोप नसणे, चिंता अशी कारणेही यामागे असू शकतात. तुमच्या बाबत काय कारण असेल हे आम्ही सांगू शकत नाही. पण आमचा सल्ला आहे की जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटा अथवा न लाजता तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशाच आणखी प्रश्नांच्या उत्तरांसाठी खालील लिंक्स वर क्लिक करा…

 10. अक्षय says

  सर माझी लिंग चा रंग खुपच कला आहे व माझी पत्नी ला आवडत नाही थोडासा रंग गोरा किंवा गुलाबी होण्यासाठी कायंय करूं

  1. let's talk sexuality says

   मित्रा तुझ्या पत्नीला सांग की हा रंग निसर्गत: तुला मिळालेला आहे. फेस क्रीम वर्षभर लावूनही लोकांचे चेहरे गोरे होत नाहीत तर लिंगाचा रंग कसा बदलणार आहेस. निसर्गाने जे दिले आहे त्याचा आनंदाने स्वीकार करणं त्याचा मान राखणं हे सुदधा खूप महत्वाचं असतंच की. आपला जोडीदार आहे तसा स्वीकारणं हा सुद्धा आपल्या जोडीदाराप्रती असलेल्या प्रेमाचा भाग आहे.
   आनंदी राहा.
   खूप शुभेच्छा!!
   घरात राहा, सुरक्षित राहा.

 11. SUKHDEV KALURAM SUBHAGADE says

  नमस्कार सर मी ३७ वर्षाचा आहे माझे लग्न होऊन ४ वर्ष झाले आहे. मला लग्नाच्या २ महिन्या नंतर शिग्र्पतानाचा त्रास सुरु झाला आणि काही दिवसांनी सेक्स करण्याची इच्छा कमी होत चालली आहे तसेच आता सेक्स करते वेळी लिंग योनीच्या जवळ गेल्या नंतर लगेच शिग्रापथन होत आहे तसेच अंगातील शक्ती कमी होत आहे आणि सेक्स करण्याची इच्छा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे उपाय सांगा ?

  1. let's talk sexuality says

   शीघ्रपतनाचा त्रास तुम्हाला बराच काळ चालू आहे, तुम्ही वरील कृती करुन पाहू शकता. त्याला जास्त वेळ अन मनाची खूप इच्छा असणं महत्वाचं आहे. यापेक्षा तुम्ही सध्या वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा असं आम्ही सुचवू. काही औषधांचा उपयोग होऊ शकतो, नेमकी औषधं कुठली हे डॉक्टर तुम्हाला सांगतील. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा.
   अन एक महत्वाचे दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

 12. Vilas says

  सर माझे वय 23 आहे मी अविवाहित आहे मी चार महिने झाले दोन – तीन दिवस सोडून हस्तमैथुन करतो मला याचा काही धोका आहे का ? आणि लग्णानंतर माझ्या वैवाहिक जीवनावर परिणाम होईल का ?

  1. let's talk sexuality says

   काहीही धोका नाहिये. घाबरु नका.
   हस्तमैथुनाबाबत अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
   https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/
   https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/

 13. VS says

  सर माझ्या लिंगाचा ताठरपणा कमी झाला आहे ..सेक्स विडिओ बघून सुद्धा लवकर ताठत नाही आणि ताठलाच तर लवकर ढिला पडतो ..हे जास्त प्रमाणात हस्तमैथुन केल्यामुळे झाले आहे का …यावर उपाय काय …

  1. let's talk sexuality says

   लिंगाची ताठरता अन हस्तमैथुन यात संबंध नाही. राहिला प्रश्न ताठरतेचा तर सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. नियमित व्यायाम करणे जसे की, सायकल चालवणे, पळणे, पोहणे, एरोबिक्स, इ. आणि निरोगी आहार घेणे यासारख्या निरोगी जीवनशैलीचा नक्कीच उपयोग होतो.

   अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/penis-erection/

 14. Roshan Hyalij says

  Sir माझे लिंग ताठरता जास्त वेळ राहण्यासाठी नैसर्गिक उपाय सांगा आणि वीर्य घट्ट करण्यासाठी आणि शुक्राणू वाढीसाठी घरगुती उपाय सांगा आणि लिंगाची कातडी मागे येत नाही मागे येण्यासाठी घरगुती उपाय सांगा

  1. let's talk sexuality says

   तुम्ही तीन वेगवेगळ्या समस्यांबाबत बोलत आहात.
   1. ताठरपणा : पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊयात. मनामध्ये लैंगिक भावना/इच्छा जागृत झाल्यावर वा लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टोस्टेरॉन (Testosterone ) या विशिष्ट संप्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते. ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तुमच्या बाबतीत यातले काही कारण असल्यास डॉक्टरांना भेटू शकता. स्वत: स्वत:चे डॉक्टर होऊन काहीही उपचार करु नका.
   2. वीर्य : वीर्य घट्ट का करायचे आहे? ते पातळ आहे, पुरुषबीजे कमी आहेत हे कसे समजले? काही चाचणी केली होती का? जर हे ही निदाने तुमची तुम्हीच केली असतील तर जास्त ताण घेऊ नका. जर याचा खूपच ताण येत असेल तर डॉक्टरांना भेटा.
   3. लिंगाची कातडी : तुम्ही जर तरुण असाल तर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काहींची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात.याबाबत तुम्ही वरील लेख वाचला आहेच. या शस्त्रक्रियेसाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य आहे.
   वरील तीनही समस्यांसाठी काहीही नैसर्गिक, घरगुती उपचार नाहियेत जर तुम्हाला याविषयी कुणाशी बोलायचे असल्यास आपला आणखी एक उपक्रम चालतो त्याचे नाव NESTS for youth. 9561744883 (इथे क्क्लिक करु शकता) या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हि सेवा संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे

Comments are closed.