शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…

शीघ्रपतन म्हणजे नक्की काय?

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.

शीघ्रपतन का होतं?

तरूणपणी जेव्हा लैंगिक संबंधांचा अनुभव नसतो तेव्हा आपल्याला ‘सगळं’ जमेल ना या चिंतेमुळे शीघ्रपतन होऊ शकतं. काही काळाने यावर ताबा येतो. यासोबत इतरही कारणांमुळे ही समस्या निर्माण होते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

यावर उपाय काय?

सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

40 Responses

  1. BALIRAM REVANSIDDHA JETHE says:

    समाधान वाटले

  2. सतीश says:

    पहिल्यादा सेक्स करत होतो 6 ते 7 वर्ष सेक्स केले आहे आत सेक्स करत असताना लिंग कमी ताठ होतो त्या वर काय उपाय

    • I सोच says:

      पहिलं आपण हे समजून घेऊया की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.

      संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.
      शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.
      शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.
      वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.
      अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील शिघ्रपतान विषयीचा लेख वाचा. खाली लिंक्स दिल्या आहेत.
      https://letstalksexuality.com/premature-ejaculation
      https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

    • Satyjeeth patil says:

      माझे लिंग ताट होत नाही आणि धातु कमी प्रमाणात होतो सेक्स करताना मन करायला होत नाही यावर उपाय ❓

      • नक्की कारण मानसिक आहे की शारीरिक हे तपासलं पाहिजे. तुम्ही डॉक्टरांना व समुपदेशकांंना भेटा. ते योग्य ते मार्गदर्शन करतील.

  3. Siddhesh says:

    माझं वय 24 आहे सतत हस्थमैथुन करून लिंग लहान आणि खूप नरम झालय।।सेक्स करताना लगेच वीर्य बाहेर येते काय करू

    • I सोच says:

      हस्तमैथुनाबद्दल अनेक गैरसमज आहेत त्यापैकी हा एक. हस्तमैथुन ही नैसर्गिक व सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. त्यामुळे लिंग लहान होण्याचा किंवा नरम पडण्याचा काहीही संबंध नाही.
      आपण हे समजून घेऊ या की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होते. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे.
      शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लिंगाचा ताठरपणा वाढवण्यासाठी लिंगाला होणारा रक्त पुरवठा वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा पोषक आहार आणि व्यायाम उपयोगी पडू शकतो. लिंगामध्ये ताठरपणा कमी वाटत असेल तर त्यासाठी आहार सुधारायला पाहिजे. चांगला आहार, व्यायाम आणि चिंतामुक्त जीवनशैली शरीराचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आवश्यक आहे. रक्ताभिसरण सुधारलं की लिंगाचा ताठरपणाही वाढतो. वरील उपायांनी फरक न पडल्यास सेक्सॉलॉजिस्टना अवश्य भेटा.
      शीघ्रपतन : स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट पद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
      https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/
      अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
      ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
      प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

  4. Sandeep says:

    माझे लघवी करताना विर्य जाते आणि आता ताठरता पण येत नाही काय करावे कुठलि आषध आहे का

  5. Vikas says:

    शीघ्रपतन समस्या आहे इच्छा कमी झालीय ताठरता खूपच कमी आहे

  6. माझं वय 28 आहे, पहिल्यादा सेक्स करत होतो. 3 वर्ष सेक्स केले आहे. आता सेक्स करत असताना लिंग कमी ताठ होते, त्यावर काय उपाय आहे का? सतत हस्तमैथुन करून लिंग लहान आणि खूप नरम झालंंय, सेक्स करताना लगेच वीर्य बाहेर येते काय करू?

  7. Rajat says:

    सेक्स करत असताना माझा 2 मिनिटात वीय पडतो या वर काही उपाय आहे का

    • तुम्ही वरील लेख वाचला असालच तेव्हा तुमच्या या समस्येबाबत तुम्हाला नक्की माहिती मिळाली असावी. नसल्यास वरील लेख परत वाचा
      तुम्ही उपायाबाबत विचारले आहे, त्यासाठी पुढील लिंक पहा.
      https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

  8. Vikas tathe says:

    विर्य गळाल्यावर माझं लिंग ताबडतोब नरम होत

    • मित्रा,
      तुझं आपल्या या बेवसाईटवर स्वागत आहे. आपल्या वेबसाईट वर खूप वेगवेगळया विषयांवर माहिती उपल्ब्ध आहे. आमची विनंंती आहे की, सवडीनूसार सगळी वेबसाईट वाचल्यास तुझ्या 90% प्रश्नांची उत्तरे मिळतील, अन नाही मिळाल्यास आम्ही मदतीला आहोतच.
      तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, वीर्यपतन झाल्यास लिंगाचा ताठरपणा जाणे ही बाब अगदी सामान्य व नैसर्गिक आहे. अन हे सगळया पुरुषांच्या बाबतीत घडते.
      अधिक माहितीसाठी लिंक पहा
      https://letstalksexuality.com/penis-erection/
      https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

      आपल्या सूचना, प्रतिक्रियांचे इथे स्वागतच आहे. पण पुढील वेळी इथे प्रश्न विचारताना इथे न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर जाऊन प्रश्न विचारा.

  9. Rahul says:

    Medical mde je sex power chya medicine miltat. Tyacha khi side effects hoto ka

    • ‘व्हायाग्रा’ व त्याच्यासारखी औषध संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी नाहीत, तर लिंगाला उत्तेजना आणण्यासाठी आहेत. जर लैगिक इच्छा होत असेल पण काही कारणांनी लिंगाला ताठरपणा येत नसेल किंवा पुरेसा ताठरपणा येत नसेल, तर ही औषध लिंगाला ताठरपणा आणण्यास मदत करतात. या औषधांनी संभोगाचा कालावधी वाढत नाही. अशा औषधाची गोळी अंदाजे एक तास संभोगाच्या अगोदर घ्यावी लागते. गोळी घेतली की लिंग आपोआप उत्तेजित होत नाही. लैंगिक इच्छा नसेल तर गोळी घेऊनही काहीही फायदा होत नाही. लैंगिक इच्छा जागृत झाली तर या गोळीतील रसायनांमुळे रक्तवाहिन्या रुंदावतात. याच्यामुळे लिंगात जास्त रक्तप्रवाह होतो व लिंगाला ताठरपणा येतो. पण अशा औषधांचे काही दुष्परिणाम आहेत. दृष्टीवर काही काळ परिणाम होणं, शरीराला कंप सुटण, दरदरून घाम येणं, मळमळण इत्यादी. या औषधांनी रक्तवाहिन्यांचा व्यास वाढल्यामुळे रक्तदाब कमी होतो. रक्तदाब खूप कमी झाला तर जिवाला धोका होतो.

  10. Janardan raut says:

    माझ वीर्य लवकर बाहेर येते. उपाय सांगा

    • तुम्ही वरील लेख वाचलाच असावा. लेख संपल्यावर उपायाबाबत एक लिंक दिलेली आहे, इथे ही देत आहोत. https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

      तसेच या समस्येसाठी वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा.
      दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

  11. Adesh says:

    Sir maza pahila veles virya lagech baher padto Tyachyananantar mala ek tasa nantar echya hote pan lavkar lingala tatharta yet nahi tyachya sathi kay upay aahe sanga plz

    • तुमच्या प्रश्नाची भाषा सुधारली आहे. तुम्ही जर आपली वेबसाईट वाचली असेल तर त्यात आपल्या लैंगिक अवयवांसाठी काही शब्द वापरले आहेत. त्याचा वापर पुढील वेळी नक्की करावा.
      साधारणपणे 1 तास हा काळ तसा जास्त नाही आहे. प्रत्येकासाठी हा काळ वेगळा असू शकतो. सुरुवातीच्या काळात तर भितीमुळे असं होऊ शकतं. पण ही समस्या ब-याच काळापासून असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटणं उत्तम ठरेल.

  12. कोमल says:

    मी एक महीला आहे
    आणि मला सेक्स करतांना किती पण वेळ सेक्स केला तरी वीर्य पात होत नाही समाधान होत नाही

  13. कोमल says:

    सेक्स केल्या
    नतर जे सुख कीवा समाधान मिळते ते मला मिळत नाही मी गरोदर होते त्या वेळी माझी पिशवी धुतली होती त्यामुळे माझी ती जागा मोठी झाली आहे
    त्यामुळे पुरुषांचा सेक्स केल्या नंतर जसे वीर्य पात होता तसा स्री चा पण होतो ना पण माझ्या बाबतीत तसं नाही
    मला सेक्स केल्या नंतर समाधान होत नाही
    या वर काही उपाय आहे का

    • पहिली गोष्ट ही आहे की विर्यपतन हे फक्त पुरुष करतात, महिला नाही.
      महिलांमध्ये लैंगिक भावना अनावर झाली वा लैंगिक संबंधांच्या वेळी महिलांच्या योनीत स्त्राव स्त्रवतो त्याला योनीस्त्राव म्हणतात वीर्य नाही. तुमचा होणारा त्रास हा शारीरिक आहे वा मनामध्ये काही धारणा तयार झाल्याने होत आहे, हे फक्त डॉक्टर व समुपदेशक सांगु शकतात. तेव्हा आधी डॉक्टरांना भेटा. तेच तुम्हाला उपाय सुचवु शकतील.

  14. Mahesh says:

    सर मझ लिंग बारीक़ आहे जाड़ होण्यासाठी काही उपाय सांगा

  15. nandu says:

    सर माझ्या लिंगाची साइज बारीक़ व् लिंगच्या खालील बाजुची साइज खुप लहान आहे टी वाढवण्याची उपाय सांगावे

  16. Nitin says:

    मला अं डकोश ला चेंडू लागला होता त्या नंतर माझ्या लिंगाला कधी कधी ता ट रता येते. व कधी कधी येत नाही आसे का होते

    • असं काही होत नाही, पण जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांना भेटावं लागेल.

  17. G says:

    सर माझे लिंग उठत नहि। सेक्स करायची इच्छा पन होते नहि काय करावे मी अगोधर हस्तमैथुन करायचो आता लगन झाला आहे पन सेक्स करायची इच्छा नहि होत

  18. गणेश थोरात says:

    Sir माझे वीर्य लवकर गळत नाही सुरुवातीला ते लवकर बाहेर येत होतं पण आता खुप वेळ लागतो काय करावं हे कळत नाही खुप त्रास होतो

    • वय, लिंगाला उत्तेजना येण्यासाठी लागणारा वेळ, नात्यामधले बेबनाव, जोडिदाराचे एकमेकांवर प्रेम नसणे किंवा नात्यामध्ये असणारा तणाव असे अनेक कारणे यामागे असू शकतात.
      जर कधी कधी त्रास होत असल्यास काही हरकत नाही. पण जर हा त्रास खूप काळापर्यंत राहिल्यास डॉक्टरांना भेटावं लागेल. यावर काही थेरपी आहेत. त्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन गरजेचे आहे.
      काही लोक आपल्या जोडीदाराच्या मदतीने हस्तमैथुन करुन वीर्यपतनाचा काळ कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण यामध्ये जोडीदाराची साथ फार महत्वाची असते.

  19. Sam says:

    माझी परिस्थिती अशी आहे की २० ते २५ मिनिट वीर्य पडत नाही आणि पार्टनर एवढा वेळ करू देत नाही हे लिंग लांब आणि जाड असल्यामुळे होते की वीर्य लवकर पडत नाही म्हणून? की पार्टनर ची काही अडचण?

    • बहुतेक पुरुषांची शिघ्रपतनाची समस्या असते. पण वीर्यस्खलन उशीरा होते याला डिलेड अथवा रीटार्डेड इजाक्युलेशन म्हणतात. याला अनेक कारणं असू शकतात.
      जर तुमच्या जोडिदाराला व तुम्हाला त्रास होत असल्यास काही थेरपी आहेत. त्यासाठी डॉक्टरांशी बोलावं लागेल. आमचा सल्ला आहे की जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटा अथवा न लाजता तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  20. Shekhar Ji says:

    संभोगा दरम्यान माझे शिश्न सैल पडते आणि त्यामुळे योनीमध्ये प्रवेश करणं अशक्य होतं. पण इतर वेळी म्हणजेच जेव्हा संभोग करण्याची वेळ नसते तेव्हा मात्र माझे शिश्न ताठ आणि कठोर असते. हे असं का होत आहे यामागील कारण मला जाणून घ्यायचे आहे.

    • वीर्य बाहेर पडत नसेल किंवा उशिरा बाहेर पडत असेल तर त्यासाठी काही शाररिक किंवा मानसिक कारणे असू शकतात. पण जर हस्तमैथुन केल्यावर वीर्यपतन होत असेल तर काही शारीरिक कारण असण्याची शक्यता नाही.बर्‍याचदा काही मानसिक ताण तणाव असतील तर असे होऊ शकते. त्याबद्दल बोलून यातुन मार्ग निघू शकेल. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/penis-erection/
      या विषयावर सविस्तर पणे बोलणे गरजेचे वाटत असल्यास आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. येथे पुढिल नंबर वर बोलु शकता. 77750 04350 इथे तुमचं म्हणणं ऐकुन घेतील. गरज असल्यास काही सेवा-सुविधांशी जोडून ही दिलं जाईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. या नंबर वर व्हाट्सअप वर मेसेज करुन तुमची वेळ ठरवा अन मोकळेपणाने बोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap