pregnancy asked 7 years ago

Jar     bhaer kadhun   Intercours Kela . Tar

pergnanacy hote

2 उत्तर
Answer for pregnancy answered 7 years ago

१. तुमचे जोडीदाराशी ज्या दिवशी लैंगिक संबंध आले तो दिवस, मासिक पाळीचक्रातील गर्भधारणेसाठी पूरक काळातील होता का? पाळीचक्राच्या कोणत्या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता असते हे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

२. संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर पाडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेसाठी पूरक काळात लैंगिक संबंध आले तर गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.

३. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे. गर्भ निरोधकांविषयी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 7 =