मासिक पाळी आणि जननचक्र

मासिक पाळी आणि जननचक्र स्त्रियांचं पाळी चक्र आणि जननक्षमतेचं चक्र म्हणजेच नवा जीव निर्माण करण्याच्या क्षमतेचं चक्र एकामेकात गुंतलेलं असतं. पाळीची संपूर्ण प्रक्रिया चक्रांमध्ये घडते. पाळीचा पहिला दिवस ते पुढची पाळी सुरू होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे एक पाळी चक्र. या पाळी चक्रातील सर्वात मोठी घटना म्हणजे स्त्री बीज पक्व होऊन बीजकोषाच्या बाहेर येऊन बीजनळ्यांमध्ये पोचणे. यालाच अंडोत्सर्जन किंवा इंग्रजीमध्ये ओव्ह्युलेशन म्हणतात. हे बीज बीजनलिकांमध्ये असताना जर त्याचा पुरुष बीजाशी संयोग झाला तर त्यातून फलित बीज तयार होतं आणि ते गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतं. या फलित बीजाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं. मात्र स्त्री बीजाचा पुरुष बीजाशी संयोग झाला नाही, फलित बीज तयारच झालं नाही किंवा गर्भाशयाच्या भिंतीवर रुजलं नाही तर गर्भाशयाचं अस्तर ठराविक दिवसांनी गळून पडतं. यालाच आपण पाळी येणे असं म्हणतो.पाळीच्या पूर्ण चक्रामध्ये चार प्रकारची संप्रेरकं काम करत असतात. पिट्युटरी ग्रंथीतून पाझरणारी एल एच आणि एफ एस एच व बीजकोषांमध्ये तयार होणारी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन ही चार संप्रेरकं पाळीचं आणि जननक्षमतेचं पूर्ण चक्रं नियंत्रित करतात.

मासिक पाळीची लांबी – माझी पाळी फार लवकर येते किंवा माझी पाळी फार उशीराने येते अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत असतो. काही मुलींची पाळी 21-22 दिवसांनी येते तर काहींना दोन दोन महिने पाळी येत नाही. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेऊ या.डॉक्टर सांगतात बरोबर 14व्या दिवशी अंडोत्सर्जन होतं आणि 28 व्या दिवशी पाळी येते. पण खरं तर हे पूर्ण सत्य नाही. प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते.पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते.त्यामुळे लवकर का उशीरा यापेक्षाही आपलं स्वतःचं पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.

संप्रेरके आणि लैंगिक भावना – स्त्रीच्या पाळीचक्राचा, त्यातील संप्रेरकांचा स्त्रीच्या लैंगिकतेशी थोडा फार संबंध आहे. अंडोत्सर्जन होण्याच्या काळात आणि आधी स्त्रीच्या बीजकोषांमध्ये इस्ट्रोजन हे संप्रेरक तयार होते. या संप्रेरकाचा प्रभाव असा की स्त्री बीज फलित व्हावं आणि गर्भ रहावा यासाठी शरीरात, भावनांमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. उदा. लैंगिक इच्छा तीव्र होणे, संभोग सुखकर व्हावा यासाठी योनिमार्ग आणि गर्भाशयात आवश्यक बदल होणे, इत्यादी. अंडोत्सर्जन होऊन गेल्यानंतर मात्र गर्भधारणा झाली असं गृहित धरून प्रोजेस्टरॉन या संप्रेरकाचा प्रभाव वाढीस लागतो. लैंगिक इच्छा कमी होते.अर्थात या शारीरिक प्रक्रिया झाल्या. प्रत्यक्षात लैंगिक संबंध सुखकर आणि संमतीने होत आहेत का, त्याविषयी स्त्री किंवा मुलगी कम्फर्टेबल आहे का यावर तिचा या संबंधांविषयीचा दृष्टीकोन तसंच भावना ठरत असतात.

पाळी चक्रात गर्भधारण कोणत्या काळात होऊ शकते? – गर्भधारणेसाठी स्त्री बीज बीजनलिकेत असणं आणि पुरुष बीज तिथपर्यंत जाऊन त्यांचा संयोग होणं आवश्यक असतं. पुढची पाळी येण्याच्या साधारण 12-16 दिवस आधी अंडोत्सर्जन होतं. बीजनलिकेत स्त्री बीज 12 ते 24 तास जिवंत राहतं. या काळात गर्भ धारणा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. मात्र हा काळ नेमकेपणाने सांगता येईलच असं नाही. तसंच पुरुषबीजं स्त्रीच्या योनिमार्गात 3 ते 5 दिवस जिवंत राहू शकतात. म्हणून अंडोत्सर्जनाच्या आधी 4 दिवस आणि नंतर 2 दिवस हा काळ जननक्षम मानला जातो. या काळात गर्भधारणा होऊ शकते.

लैंगिकता जागरुकता आणि कुशल गर्भनिरोधन (सुरक्षित गर्भनिरोधकांच्या माहितीसाठी सेक्स बोलें तो सदर पहा) – आपल्या शरीरात, पाळी चक्रात कधी आणि काय घडतंय याची माहिती आपण घेतली, त्या घटनांचा मागोवा घेतला, नोंदी ठेवल्या तर काही काळाने अंडोत्सर्जन नक्की कधी, कोणत्या क्षणी झालं हेही आपल्याला समजू शकतं. गर्भधारणा कधी, कुठल्या काळात आणि कशी होते याची माहिती घेतली तर ती होण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.सुरक्षित गर्भनिरोधकांचा वापर करून आणि संभोगाव्यतिरिक्त प्रणयाच्या इतरही पद्धती अवलंबून गर्भधारणा टाळता येऊ शकते. यातून पुरुषांनाही जननाच्या प्रक्रियेत जबाबदारपणे सामील होता येतं. मात्र त्यासाठी आपल्या शरीराचं, पाळी-जनन चक्राचं अचूक ज्ञान, दोघा जोडीदारांचा एकमेकांवरचा विश्वास आणि सहकार्य आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी letstalksexuality.com@gmail.com येथे संपर्क साधा.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

81 Responses

  1. शैलेश विठ्ठलराव गेडाम says:

    माझ्या लग्नाला ६ वर्षे झाली असून मला एक २ वर्षाची मुलगी आहे. माझी पत्नी माझ्यापेक्षा २ वर्षाने मोठी आहे. माझी पत्नी पूर्वी सारखी सेक्स करतांना प्रतिसाद देत नाही. मी माझ्या पत्नी सोबत या विषयावर चर्चा केली असता ती या विषयावर बोलण्यास तयार होत नाही. काय करावे सुचवावे कृपया.

    • I सोच says:

      प्रत्येक व्यक्तीला सारख्याच प्रमाणात सेक्स करावंसं वाटतं असंही नाही. काही जणांना जास्त इच्छा होते तर काहींना कमी. पण त्यामध्ये समतोल साधणं आणि एकमेकांवर जबरदस्ती न करता लैंगिक संबंधांचा मध्यमार्ग शोधून काढणं यात महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्हाला जमेल अशी आशा आहे. लग्नाचं नातं सेक्सशिवाय इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्यामुळे बाकी गोष्टींचाही विचार करा. आणि त्या नीट असतील, एकमेकांशी संवाद असेल आणि मुळात प्रेम असेल तर तुम्हाला नक्की मार्ग सापडेल.

      कामाच्या जबाबदाऱ्या, एकांत नसणं, इतर कुठल्या कारणामुळे मनावर ताण असेल तरी त्याचा परिणाम लैंगिक इच्छेवर आणि संबंध ठेवण्याच्या इच्छेवर होऊ शकतो. त्याही गोष्टी लक्षात घ्या. अनेकदा स्त्रियांवरती असणाऱ्या अशा सगळ्या जबाबदाऱ्या, त्याचे ताण, दमणूक अशा गोष्टी लक्षातच घेतल्या जात नाहीत. त्याबद्दल त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला पाहिजे. लैंगिक इच्छा आणि उत्तेजना या दोन्ही मेंदूतून नियंत्रित होतात. लैंगिक सुखाची शारीरिक व भावनिक अनुभूतीही मेंदू करतो. प्रत्येकाच्या मेंदूची जडण-घडण वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा लैंगिक अनुभव हा स्वतंत्र असतो. संभोगातून कोणाला किती लैंगिक सुख मिळतं याची तुलना करता येत नाही. म्हणूनच संभोग हा दोन पायांमध्ये नसून तो दोन कानांमध्ये आहे असं म्हटलं जातं.

      त्यांना तुमच्याशी बोलायचं नसेल तर इतर कोणाचीतरी किंवा समुपदेशकाची मदत घ्या.

      ऑल द बेस्ट!!!

      • Ajy says:

        जर पाळीच्या ४ दिवशी विना निरोध सेक्स केला तर गर्भ धारणा होऊ शकते का ?होत असेल तर काय उपाय करावेत ते टाळण्यासाठी

        • खरं तर शक्यता कमी आहे, पण गर्भधारणा होणारच नाही असं म्हणणं जरा घाईचं होईल. कारण पुरुषबीजं (sperms) योनीमार्गात व गर्भाशयात 5 दिवस जिवंत राहू शकतात. अन जर या दिवसांमध्ये जर
          बीजविमोचन (ovulation) झाले व त्याचा स्त्रीबीजाशी संबंध आला तर गर्भधारणा होऊ शकते.
          मासिक पाळी, गर्भधारणा कशी होते व इतर बाबींबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
          https://letstalksexuality.com/conception/
          https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/
          https://letstalksexuality.com/male-body/

  2. Bandu Javir says:

    पाळी नंतर 6 दिवसांनी सेक्स केला तर गरभ राहु शकतो का?

    • I सोच says:

      याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे आणि लेख आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते नक्की वाचा.गर्भधारणा नक्की कशी आणि कधी होते याबद्दल माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
      https://letstalksexuality.com/conception/

  3. वैशाली says:

    माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले परंतु मि प्रेगनेंट राहत नाही. माझ्या पतिचे स्पर्म काऊन्ट 2महिने पहले 2मिलियन होते आता स्पर्म काऊन्ट केले तर 34 मिलियन झाले आहे प्रेगनेंट व्हायला कीती स्पर्म ची आवश्यकता आहे।

  4. vaishali says:

    केव्हा सभोग केला म्हणजे दिवस राहूु शकतात

  5. Anandraj says:

    माझा gf बरोबर असुरक्षित संबध आला होता आणि तिला दिवस गेले आहेत,अन तिला गोळ्या दिलाय hotay अन तिचा अंगावरून पण रक्त गेलं पण,अजून योनी मार्गात काय तरी असेल असं वाटत आहे तरी plz मदत करा ,काय करू ते सांगा

    • I सोच says:

      मित्रा, तुम्ही दोघेही सध्या वेगळ्याच टेन्शनमधून जात असाल याची कल्पना तुझ्या प्रश्नातून येत आहे. याविषयी बोलण्यासाठी ‘मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763’ येथे फोन कर.

      मित्रा, हा प्रश्न तू विचारला आहेस यावरून तू जबाबदारी टाळत नाहीस हे समजत आहेच. लैंगिक संबंध हा तुमच्या दोघांनी मिळून घेतलेला निर्णय असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांना दोघांनी मिळून सामोरं जायला पाहिजे. आणि इथून पुढे काळजी घ्या. नको असलेली गर्भधारणा आणि त्यातून होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे आवश्यक आहे. आपल्याकडे आजही अनेकांना सुरक्षित गर्भपात कुठं करायचा, तो कसा होतो, गर्भधारणा होऊ नये म्हणून काय करायचं, याबद्दल माहिती नसते किंवा त्यांना मिळालेली माहिती योग्य असेलच याची खात्री नसते. माहितीअभावी अनेक महिला गरोदरपण नको असेल तर असुरक्षित गर्भपाताचा मार्ग अवलंबतात. याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. काही वेळेला हे प्रयत्न जीवावरही बेतू शकतात. त्यात गर्भधारणा लग्नाआधिची असेल तर जास्तच गुंतागुंत वाढते.

      खालील काही लिंक्सवरील माहिती तुमच्या दोघांसाठी उपयोगी ठरेल.
      https://letstalksexuality.com/conception/
      https://letstalksexuality.com/helpline-abortion/
      https://letstalksexuality.com/contraception/
      शिवाय वेबसाईटवर याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ती नक्की वाचा.
      https://letstalksexuality.com/question/

  6. sam says:

    mazya GF chi period adich mahine hotil aaleli nahi…aamhi apsht sex kelela hota pn aamhi prega test Keli tr ti pregnant nahiye… please period yenyasathi upay sanga

    • I सोच says:

      गर्भधारणा नक्की नाही ना ? याची खात्री करण्यासाठी हवं तर आणखी एकदा टेस्ट करा. गर्भधारणा नसेल तर गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
      काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
      अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
      टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

  7. Shyam says:

    Gharbh dharana zalya natar mashik pali yete ka

    • I सोच says:

      नाही गर्भधारणा झाल्यावर पाळी येत नाही. गर्भधारणा असेल आणि योनीमार्गातून रक्तस्राव होत असेल तर ताबोडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

  8. अनामिका says:

    मासिक पाळीच्या चौथ्यादिवशी संभोग झाल्यावर गर्भधारणा होते का?लक्षणे काय असतील?

  9. hrushant kantode says:

    sex kelya nantr 15 divsani period ala parantu 2nd period mahina sampla tri ala nh pregnant asu shakte ka

    • I सोच says:

      सेक्स नंतर मासिक पाळी चुकणे किंवा न येणे हे गर्भधारणा झाल्याचे लक्षण आहे. तुम्ही प्रश्नात सांगितल्याप्रमाणे तुमचा सेक्स झाल्यानंतर १५ दिवसांनी मासिक पाळी आली होती. यावरून असे स्पष्ट होते की गर्भधारणा झालेली नाही. पाळीनंतर लैंगिक संबंध आले असतील तर मात्र प्रेग्नन्सी टेस्ट करून गर्भधारणा आहे की नाही ते चेक करा.
      गर्भधारणे व्यक्तिरिक्त मासिक अनियमित असण्याची इतरही काही कारणं असू शकतात.
      गर्भधारणा नको असेल तर जोडीदाराशी बोलून गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे अधिक योग्य राहील.
      गर्भनिरोधकांविषयी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
      https://letstalksexuality.com/contraception/

  10. Akshay says:

    period madhe sex kela tr pregnant hot ka

    • I सोच says:

      नमस्कार मित्र मैत्रिणींनो.
      तुमचे प्रश्न, प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. तुमच्या प्रश्नांना त्वरित उत्तरं देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच आपल्या वेबसाईटवर प्रश्नांसाठी आपण एक खास जागा उपलब्ध करून दिली आहे https://letstalksexuality.com/ask-questions/ .

      काही वेळेस लेखाखालील प्रतिक्रियांना उत्तर देण्याचे राहून गेले आहे हेही आमच्या ध्यानात आले आहे. आपल्या कमेंट्सला त्वरित उत्तर देण्याचा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. तेंव्हा आपले प्रश्न आणि प्रतिक्रिया आवश्य द्या.
      आभारी आहोत.

  11. Dipak says:

    माझा पत्नीची पाळीची तारीख 15 होती परंतु ती पाळी झाली नाही माझा सेक्स तिच्यासोबत 17 तारखेला झाला आहे परंतु मी कंडोमचा वापर केला आहे तर पाळी मध्ये काही प्रॉब्लेम तर होंनार नाही ना

  12. माझी पत्नी 3 महिना चालू गर्भवती असताना पाळी यते पण पूर्ण नाही थोळ स ब्लाडिंग होत आहे, काही उपाय

  13. akshu says:

    Mazi gf sex la ghabrte…tila vatt ki prds nntr 20 days shivay sex nko…coz pregnnt hoil….ti ata 18 chi hoil…n tich weight 50 kg. Asel….prds mdhe 2nd day la tras hoto….tr amhi prds nntr kdhi ektr yaav??

  14. Raj says:

    Mazya gf la mc 7 date la aali hoti ani amhi 19 date la sex kela tr ti pregnant hou shkti ka

    • I सोच says:

      नमस्कार मित्र मैत्रिणींनो.
      तुमचे प्रश्न, प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. तुमच्या प्रश्नांना त्वरित उत्तरं देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच आपल्या वेबसाईटवर प्रश्नांसाठी आपण (सोबतच्या लिंकमध्ये) एक खास जागा उपलब्ध करून दिली आहे. https://letstalksexuality.com/ask-questions/

      काही वेळेस लेखाखालील प्रतिक्रियांना उत्तर देण्याचे राहून गेले आहे हेही आमच्या ध्यानात आले आहे. आपल्या कमेंट्सला त्वरित उत्तर देण्याचा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. तेंव्हा आपले प्रश्न आणि प्रतिक्रिया अवश्य द्या.
      आभारी आहोत.

  15. Nirank patil says:

    Mala 3 varshacha mulga aahe aani ajun 2 varsh mul nakoohet tar Garbhdharna talaychi asel tar pali aalyanantar kiti divsanni sambhog karu shakto

  16. Pashu says:

    Mazya patni chi period date 21 ahe amhi 7 tarkela unsafe sex kela ahe tr ti pregnant hoel ka …

  17. SHANKAR says:

    सर माझ्यामध्ये अनुवावंशिकता आहे आता माझे लग्न ठरले आहे।मला भीती ही वाटते की माझ्या होणाऱ्या मुलामध्ये पण हा प्रॉब्लेम येईल।त्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या लागतील।अथवा संबंध ठेवण्यापूर्वी कोणती चाचणी करावी लागेल का की होणार बाळ सुदृढ जन्माला येईल।
    कुपया मार्गदर्शन करा।

    • I सोच says:

      नमस्कार मित्र मैत्रिणींनो.
      तुमचे प्रश्न, प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. तुमच्या प्रश्नांना त्वरित उत्तरं देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच आपल्या वेबसाईटवर प्रश्नांसाठी आपण (सोबतच्या लिंकमध्ये) एक खास जागा उपलब्ध करून दिली आहे. https://letstalksexuality.com/ask-questions/

      काही वेळेस लेखाखालील प्रतिक्रियांना उत्तर देण्याचे राहून गेले आहे हेही आमच्या ध्यानात आले आहे. आपल्या कमेंट्सला त्वरित उत्तर देण्याचा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. तेंव्हा आपले प्रश्न आणि प्रतिक्रिया आवश्य द्या.
      आभारी आहोत.

  18. Megh says:

    Mala period 3 divasch yeto..nantr mahinyane e1-2 divas mage pude houn parat period yeto…maja 6vya divashi sex contact ala…pregnancy risk ahe ka?

  19. Parag says:

    sex kelya nantr dusarya divshi pali ali ahe..गर्भवती zali asel ka?

    • I सोच says:

      नाही,

      तुमचे प्रश्न, प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. तुमच्या प्रश्नांना त्वरित उत्तरं देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच आपल्या वेबसाईटवर प्रश्नांसाठी आपण (सोबतच्या लिंकमध्ये) एक खास जागा उपलब्ध करून दिली आहे. https://letstalksexuality.com/ask-questions/

      आभारी आहोत.

  20. माझ्या मिसेस मासिक पाळी 30 ते 35 दिवसांनी येते तर मी कोणत्या दिवशी सम्भोग करू जेनेकरुण माझी मिसेस गरोधर राहील कारन मला मूल हव आहे .

    • I सोच says:

      पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी आपण प्रयत्न करू शकतो.
      अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
      https://letstalksexuality.com/conception/

  21. Vijay says:

    Mazi gf la problem alya nantr 12 divasani parat blading zal tya nantr ata 1 mahina zala tri problem ala nahi ani preganewsya test kit ne 2 nda test keli pnpregnent nahi mg pregnent asu shakte ka

    • I सोच says:

      काही कारणास्तव शरिरातील हार्मोनल बदलांमुळे पाळीचक्रात बदल घडू शकतो. त्यामुळे 12 दिवसांनी रक्त आले असावे तसेच दुसरी शक्यता अशी की, प्रेग्नंशी किटच्या ही कधी कधी काही मर्यादा असतात, त्यामुळे थोडी वाट पहा व पुन्हा एकदा त्यातील वेळ व काळानुसार किट वापरुन पहा. जास्त काही वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
      अन हो शारीरिक संबंध करताना लिंगसांसर्गिक आजार व नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी निरोधचा वापर नक्की करत जा.

      जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

  22. Jivan says:

    Sex kelya nantr…sparm yoni var padale tar…garbhadharana hote ka?

    • I सोच says:

      गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लवकरात लवकर प्रेग्नंसी टेस्ट करा.
      गर्भधारणा नक्की कशी होते हे समजुन घेण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या.
      https://letstalksexuality.com/conception/
      नको असणारी गर्भधारणा टाळ्ण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
      https://letstalksexuality.com/contraception/

  23. Bhavana says:

    Maze last period 11 july la aaleli mala dr. Ne23 te 27 tarke paryant sex karayla sagitle hote pan ajun pali aaleli nahi me pregnancy test 2 wela kela ajun negetive dakvte tar aaj 12 divas jale pali aali nahi tar udya cheak karu ka

    • I सोच says:

      पुढिल वेळेस प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

      तुम्ही परत एकदा प्रेग्नंसी किट वापरुन खात्री करु शकता किंवा थेट डॉक्टरांना भेटा, त्यामुळे तुम्हाला अचूक निदान जाणून घेता येईल .

  24. Ankush says:

    Mazya wife chya nipple discharge hot ahe tr ti pregnancy ch karn ahe ka?

  25. I सोच says:

    खरंतर हा वैद्यकीय स्वरूपाचा प्रश्न असल्याने तुम्हाला योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणेच जास्त फायदेशीर असेल.

  26. Ganesh Bhandge says:

    पाळी येण्याचा दिवस आगोदर संबध आले तर धोका आहे कारण पाळी तारीख आणि प्रेग्नन्सी वाट बघत.असतो म्हणून प्रश्न. आहोत संबंध आले तर धोका आहे का

    • I सोच says:

      नक्की कोणत्या धोक्याबाबत बोलत आहात हे लक्षात येत नाही आहे.
      तुम्ही जर नको असणार्या गर्भधारणेबाबत विचारत असाल तर https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/ या लिंकला भेट द्या.
      तुम्हाला वाट्णारी काळजी स्वाभाविक आहे तेव्हा नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी व इतर लिंगसांसर्गिक आजारापासून वाचण्यासाठी नेहमी निरोधचा वापर करा. अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढिल लिंकला भेट द्या. https://letstalksexuality.com/contraception/

      पुढिल वेळेस प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

  27. Nakul says:

    माझ्या misses ला तीन ते चार महीन्यातुन एकदाच पाळी येते. आली तर ती सात ते आठ दिवस येते. आणि कधी कधी एकच दिवस. तुमच्या कडुन काही सल्ला मिळेल का. किंवा डाँक्टरांचा मोबाइल नंबर. पाळी नियमित येण्यासाठी काही solutions ?

    • एखाद्या वेळी असे झाले तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मात्र हे सारखं असंं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.
      पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
      काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
      तुमच्या पत्नीचे वय तुम्ही सांगितले नाही, कारण वयाच्या 45-50 च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं. यासाठी हि लिंक पहा. https://letstalksexuality.com/menopause/

      मासिक पाळी व इतर बाबींच्या अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
      टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. न पाहता अशा बाबतीत सल्ले देणं योग्य नाही त्यामुळे तत्काळ एखाद्या स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्या. शरीराविषयी आपण जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

      पुढिल वेळेस प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

  28. Shyam says:

    Majhya patnichi padi 29/07/2018 la Ali hoti tya nanter nahi Ali tapsni jhali garbhvati ahe…mala as vicharaych ahe ki ya tarkhe nusar kiti mahine jhale asavet……divas kase mojavet..? Ya var ekhada lekh nahi ka tumcha

    • शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून आज पर्यंत महिने मोजा म्हणजे तुम्हाला नेमके किती महिने झाले ते लक्षात येईल. अधिक नेमके महिने आणि दिवस किती झाले आहेत ते समजून घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करा.

  29. Sandhya says:

    Mala white water angavarun jat ahe . Taap yene . Anga dukhne . Paay jad hone ani zopun rahavasa vatane . period yaychya 23 date ahe 23 la pn period ale nahi tr pregnet rahu shakto ka

  30. Yogesh chitalkar says:

    माझे लग्न होऊन 2 वर्षे झाले एकदा पत्नी गरोदर राहिली व नंतर 2 महिन्याचा गर्भ खराब निघाला नंतर गरोदर राहत नाही उपाय सांगा

    • गर्भ असा का झाला याचंं कारण शोधणं गरजेचंं आहे. कुठलीही तपासणी न करता गरोदर का राहत नाही हे सांगणं जरा कठिण आहे. या मागचं कारण शोधण्यासाठी तुम्ही स्त्री रोग तज्ञांंना भेटा.

  31. बाळू बामणे says:

    सर नमस्कार
    माझ्या मिसेस बरोबर पाळी येण्या अगोदर 4 दिवस आधी सेक्स केला आहे. तरी पण गर्भ धारणा झाली आहे. पण आम्हाला नको आहे. उपाय सांगा.

    • मूल नको असल्यास नेहमी निरोध वापर करणे गरजेचे आहे. हे नेहमी लक्षात ठेवा.
      गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

  32. Kumar Singh says:

    Mi aaj night la sex kela gf brobr ani tila early morning samajla ke tila pali aale. Pali yaicha 1tas adhi sex kela hota tr kahi problem hou shakto ka????

  33. Krushna says:

    Sir mi majya gf la period yeychya 4 divas adhi sex kel ata tila 2mahine hot ale tila period yet nhi ata tila pregnancy yeu shakt ka

    • खरंतर गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पुढची पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुष बीजाशी त्याचा संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. याविषयी अधिक माहिती खालील लेखामध्ये दिली आहे ते वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      https://letstalksexuality.com/conception/
      https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

      पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

      सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का? याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

      गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

  34. Sunny says:

    Peirod miss zala .prga kit ne 2vela check kel pn negative aale..pregnant asu shkte ka

    • जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). अन जरी टेस्ट पॉसिटीव्ह आलीच तरी स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो.
      घाबरू नका, आम्ही आहोत सोबत.

  35. Sandesh says:

    Masik Pali mdhe sex kela tr n condom lavta tr ajar hoto ka

    • पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एड्स किंवा इतर लैंगिक आजार असेल तर स्त्रीला लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
      अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
      https://letstalksexuality.com/sex_during_periods/ शक्य झाल्यास या लेखाच्या खालील लिंक ही वाचा.

  36. Sandesh says:

    Masik Pali mdhe sex kele tr purshyala ajar hoto ka Ani jhale tr konte ajar hotat

  37. Garry says:

    Period chya 5th day la sex kel hot……4 mahine period aale nahi ….test pn negative ahe
    Pregnant asu shakte ka ?

    • हे असं सांगणं जरा कठिण आहे, कारण गर्भधारणेशिवायही पाळी न येण्याची बरीच कारणॆ आहेत.
      ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
      काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते.
      अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
      टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

  38. पूर्वा says:

    मला १ जुलै ला पाळी आली होती.पण sonography madhe १७ July पासून गर्भधारणा दाखवली जात आहे तर माझं ovulation केव्हा झालं असेल.

    • पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते.

      अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात हे तुम्ही जाणताच.

      प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो. बऱ्याच जनांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन हे १४ व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशिराही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी ७ व्या दिवशीही अंडोत्सर्जन होऊ शकतं. अंडोत्सर्जनाच्या आधी ४ दिवस आणि नंतर २ दिवस हा काळ जननक्षम मानला जातो. या काळात गर्भधारणा होऊ शकते, त्यामुळे तुमच्या बाबतीत ही तारिख १७ च्या आधी दोन ते चार दिवस असावी.

  39. Nilu says:

    Mazya palichi date 28 aahe.Me 23 la sex kela hota.ani mla pali 32-35 diwsani yete, tr mla ase vicharayche hote ki me aata pregnant Rahu dhakte ka?

    • गर्भधारणेची शक्यता कमी आहे पण शक्यता फेटाळता येणार नाही. कारण पाळीचे चक्र, त्याची नियमितता, बिजविमोचनाचा कालखंड, पुरुषबीजे व त्यांचे प्रमाण, अन अजुन खूप काही बाबी गर्भधारणेसाठी कारणीभूत असतात. अन हे सगळं गर्भधारणेसाठी जुळून यावं लागतं. त्यामुळे हो किंवा नाही असं सांगता येणं जरा कठिण आहे. तेव्हा पहिल्यांदा प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात ते आणा. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

  40. Mamta says:

    Maze Pali 2divas zale ahe pan mala ulati. Sarkha vat me prgenta asu Shakhtar ka

    • शक्यता नाहीच्याच बरोबर आहे. तुम्ही वरील लेख वाचला आहेच. अंडोत्सर्जन होण्याचा कालावधी बाबत तुम्ही वाचलं आहेच. तेव्हा आणखी काही कारणांमुळे तुम्हाला उलटी वा मळमळ होत असेल. डॉक्टरांना भेटा.
      गर्भधारणेबाबत अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/conception/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap