Browsing Category

आपली शरीरे

आपण सतत वाढत असतो आणि आपण सतत बदलत असतो. जन्मापासून आपल्या शरीराच्या आकारात किती तरी बदल झाले आहेत. आपली कौशल्यं वाढली आहेत. आपल्या शरीराचा आकार, रंग, क्षमता अनेक गोष्टींवर अवलंबून असते. वय, लिंग, कामाचा प्रकार, जनुकं, आपण जिथे राहतो तिथलं वातावरण आणि समाजाच्या चाली रिती या सगळ्याचा आपण कसं दिसतो यावर खूप खोल परिणाम होत असतो. रस्त्यात उन्हात काम करणाऱ्या कष्टकऱ्याचं शरीर ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या माणसापेक्षा वेगळं दिसणारच. आपली शरीरं वेगळी आहेत तरीही नॉर्मल आहेत.

आपल्या शरीराच्या आत काय चालू असतं हे आपल्याला समजत असतं. शरीर आपल्याला ते सांगत असतं. एखादा आजार असो किंवा काही तरी बदलत असो. शरीराची भाषा समजू लागली तर आपल्याला या गोष्टी कळू शकतात. आणि त्या ऐकल्या, त्यानुसार आपल्या राहणीत काही बदल केले तर आपली आपल्या शरीराशी मैत्री होऊ शकते. अधिक माहितीसाठी शरीर साक्षरता वाचा.

जननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १

"आमच्या नात्यातील एका मुलीला गर्भाशय नाही. असं असू शकतं का? किंवा “ लिंगाच्या टोकाऐवजी लिंगाच्या मध्ये छिद्र असू शकतं का?" अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न कार्यशाळेत विचारले जातात. विचारणाऱ्यांना जननेंद्रिय सोडून इतर अवयवातील वेगळेपण स्वीकारण्यास…

लिंग ताठरता (Penis erection)

आपल्या वेबसाईटवर सध्या लिंगाच्या ताठरतेबाबत अनेकदा प्रश्न विचारले जात आहेत. कारण पुरुषांच्या लिंग ताठरतेविषयी अनेक समज-गैरसमज अनेकांच्या मनात असतात. पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊयात. मनामध्ये लैंगिक…

चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक २

मागील लेख चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १ यामध्ये आपण चाळीशीनंतरच्या कामजीवनाविषयी अस्तिवात असणारे गैरसमज पाहिले. तसेच पुरुषाच्या कामजीवनातील होणारे बदल पाहिले. या लेखात चाळिशीनंतर स्त्रियांच्या कामजीवनात काय बदल होतात व इतर काही…

चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १

बधाई हो! काही दिवसांपूर्वी बधाई हो नावाचा हिंदी चित्रपट येऊन गेला, अन त्यानंतर चाळिशीनंतरच्या कामजीवनाबाबत चर्चा सुरु झाल्या. लोकांची मते बरीच संमिश्र दिसत होती. याच विषयाबाबत आपल्या वाचकांना माहिती मिळावी या उद्देशाने जेष्ठ लैंगिक…

स्तनांचा आकार

वेबसाईटवर स्त्रियांसंबंधी येणाऱ्या प्रश्नांमध्ये अगदी सर्रासपणे विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्तनांच्या आकाराविषयीचा प्रश्न. ‘माझे स्तन खूप लहान आहेत, वाढविण्यासाठी काय करू ?’, ‘माझ्या पत्नीचे स्तन खूप लहान आहेत, माझ्या गर्लफ्रेंडचे स्तन…

स्तनांचा कर्करोग

भारतामध्ये जसजसा ‘विकास' होत आहे तशी स्तनाच्या कर्करोगामध्ये दर वर्षी 1 % इतकी वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 2002 मध्ये भारतामध्ये 80,000 स्त्रियांना स्तनाचा कर्करोग झाला होता. स्तनाचा कर्करोग हा सर्वात अधिक प्रमाणात आढळणाऱ्या…

अंगावरून पांढरे पाणी जाणे (White discharge)

आपल्या वेबसाईटवर अंगावरून पाणी जाणे (White discharge) याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच योनीतून होणाऱ्या पांढऱ्या स्रावाविषयी थोडक्यात माहिती लिहित आहे…

‘बच्चू मांगे मोअर’ च्या काळात ‘आयुष’चे सल्ले? -शर्मिला कलगुटकर

हा फोटो आहे आठव्या महिन्यातला. माझ्या मुलाच्या, आत्मजच्या जन्मापूर्वीचा. मी गोवेकर. अट्टल मासेखाऊ. दिवस राहिले तेव्हापासून कालव, पापलेट, हलवा, बांगडा ,खेकडे खावेसे वाटायचे. मध्येच आबा-फणसाचीही हुक्की यायची. एरवी कधीच न आवडलेली काळी द्राक्षं…

असं काहीतरी आहे जे मला माहित नाहीये

असं काहीतरी आहे जे मला माहित नाहीये पण माहित असायला हवं आहे. मला काय माहित नाही हे मी जाणत नाही तरीही ते मला माहित असायला हवं आहे. मला अगदी मठ्ठ असल्यासारखं वाटतं कारण एकीकडे ,मला ते माहित पण नाही आणि जे माहित नाही ते काय…

मासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज  

यूनिसेफच्या माहितीनुसार, मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी संवाद वाढवण्याची गरज आहे. असे असूनही याबाबतीत खूप कमी प्रयत्न झाले असल्याचे दिसून येते. भारतामध्ये ‘मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्य’ या महत्वाच्या आरोग्याच्या मुद्द्याविषयी…