पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)
या वेबसाइटचा उद्देश लैंगिकताविषयक माहिती सर्वांना सहजपणे उपलब्ध करून देणे व माहितीच्या जोडीने लैंगिकतेकडे अधिक खुलेपणाने व सुदृढ दृष्टिकोनाने पहाता यावे हा आहे.
या वेबसाइटवरील आशय आणि विषय १६ वर्षांपुढील व्यक्तींसाठी योग्य आहेत.
हा विषय बहुस्तरीय असल्याने वेबसाईटमध्ये प्रवेश करण्याआधीच आम्ही काही भूमिका स्पष्ट करू इच्छितो. कोणत्याही स्वरुपातील हिंसा, जबरदस्ती, लैंगिक छळ, बलात्कार, छेडछाड, बालकांचे लैंगिक शोषण किंवा कुणाच्याही संमतीविरोधात केलेले अश्लील चित्रण आणि त्याचे प्रसारण याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लहान मुले-मुली व स्त्रिया वा इतर लिंगभावाधारित हिंसा आणि अशा हिंसेला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही कृतीच्या चित्रणाला तसेच प्रसारणाला आमचा सक्त विरोध आहे. जात, धर्म, लिंग, लैंगिकता, भाषा, प्रांत, शारीरिक किंवा मानसिक क्षमता इत्यादी कशाहीमुळे केला जाणारा भेदभाव आम्हाला मान्य नाही.
प्रत्येक व्यक्तीची लैंगिकता आणि तिची अभिव्यक्ती वेगवेगळी असते, त्याविषयीचे निर्णय घेण्याचा अधिकार त्या संबंधित व्यक्तीचा आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. योग्य पद्धतीने लैंगिकतेची माहिती मिळणे आणि त्याबद्दलची निरोगी भावना किशोरवयीन आणि तरुणांच्या मनात तयार होणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते.
वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी
या साइटवरील मजकूर विनानफा तत्त्वावर कुणीही वापरू शकते. असा वापर करताना, ‘स्रोत: Let’s Talk Sexuality by Prayas Health Group असा उल्लेख करावा.
या वेबसाइटवरील माहिती व संसाधने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी आमची इच्छा आहे. या सर्वांचा वापर विनानफा करता येईल. मात्र वरीलप्रमाणे उल्लेख करूनच हे साहित्य वापरण्यात यावे. वेबसाइटवर आलेले प्रश्न, इतरांनी केलेले लेखन, त्यावरील टिप्पण्या यातील प्रत्येक विचाराशी संस्था सहमत असेलच असे नाही. काही आशय बाद करण्याचा, संपादित करण्याचा, प्रसिद्ध न करण्याचा किंवा राखून ठेवण्याचा अधिकार संस्थेकडे राहील.