प्रश्नोत्तरेCategory: Private Questionअभिप्राय आणि प्रश्न

सर तुम्ही दिलेल्या उत्तरामुळे कॉन्फिडन्स आला , मनातली भीती गेली .थँक्स सर !.सर माझा अजून एक प्रश्न आहे . जेव्हा एकादी अनोळखी मुलगी माझ्याकडे बघते तेव्हा मला गाबरल्यासारखं होत , काय करावं कळत नाही . मी काय करू ?? मग मी बघून ही ना बघितल्यासारखं करतो .आणि जेव्हा मी एकाद्या ओळखीच्या मुलीशी बोलतो तेव्हा सगळे काय म्हणतील याचा मला विचार येतो ..आमच्या कॉलेज मध्ये असे दोघे बोलत असतील तर ते gf bf असावे असा समजतात ..कधी कधी मलाही दुसऱ्या विषयी तसाच वाटतं …असं का होत ???

2 उत्तर

आम्ही दिलेल्या उत्तराचा तुमचा कॉन्फिडन्स येण्यासाठी, मनातली भीती जाण्यासाठी फायदा झाला, हे ऐकून खूप छान वाटले. तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.

आता वळूयात तुमच्या प्रश्नाकडे. आपल्या समाजात स्त्री-पुरुष संबंधांकडे निकोप दृष्टीकोनातून पहिले जात नाही. लहानपणापासूनच मुलांनी मुलींशी बोलायचे नाही आणि मुलींनी मुलांशी बोलायचे नाही अशा वातावरणात आपण राहिलेलो असू तर अनोळखी मुलींशी बोलताना भीती वाटू शकते. पण हळूहळू ही भीती नक्कीच कमी करता येईल.

ओळखीच्या मुलींसोबत संवाद वाढवल्याने हळूहळू नक्कीच भीती कमी होईल. सगळे काय म्हणतील याचा कशाला विचार करायचा ? स्त्री- पुरुष नाते मग ते कोणतेही असो, मैत्रीचे किंवा प्रेमाचे ही खूप सुंदर गोष्ट आहे. शिवाय तुम्हाला एक माणूस म्हणून समृद्ध करण्यासाठी आवश्यक देखील आहे.

एखादा मुलगा किंवा मुलगी बोलत असतील तर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध (लफडे?) असेल असे अनेकांना वाटते. आपली समाजव्यवस्था त्याला कारणीभूत आहे. सगळ्यात स्त्री- पुरुष संबंधांकडे एकाच नात्यातून बघणे तर चुकीचे आहेच.

पण पुढे जाऊन मी म्हणेन की, जरी ते एकमेकांचे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, प्रेमी-प्रेमिका असतील तर त्यात काय गैर आहे ? प्रेम ही खूप नैसर्गिक आणि सुंदर गोष्ट आहे. त्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला की हे प्रश्न, ही भीती अपोआपच कमी होईल.

आपल्या मनावर लहानपणापासून कोरलेल्या गोष्टी इतक्या लवकर दूर सारून नवा विचार स्वीकारणे इतकं सोपं नसतं हे मला मान्य आहे. पण प्रयत्न तर करायलाच हवा.

लोकांचे, समाजाचे प्रेशर्स घेऊन जगण्यापेक्षा तुम्हाला काय वाटते ? तुम्हाला कशातून आनंद मिळतो? तुमच्यासाठी काय योग्य आहे? याचा विचार करा. बघा तुम्ही खूप मोकळे व्हाल … जास्त आनंदाने आणि मुक्तपणे जगू शकाल… एक व्यक्ती म्हणून समृद्ध व्हाल…

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 9 =