आभार... asked 7 years ago

प्रथमतः आपले मनपूर्वक आभार…

सध्या माझा काही प्रश्न नाही, इतरांच्या प्रश्नांच्या उत्तरातून समाधान होत आहे, प्रश्न विचारताना ओळख गुप्त ठेवली जात असल्यामुळे काही वाचक खूपच वाईट शब्दप्रयोग करतात, तरीही आपण समतोल न जाऊ देता योग्य पद्धतीने त्यास उत्तरे देता हे "कौतुकास्पद" आहे…

"लैंगिकतेवर बोलू काही" हा स्तुतीतुल्य उपक्रम आहे, पुढील वाचलीस खूप खूप सदिच्छा…!

1 उत्तर
Answer for आभार... answered 6 years ago

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार ! काही वाचक खूपच वाईट शब्दप्रयोग करतात हे खरं आहे, काहींना पर्यायी शब्द माहित नसतात म्हणून आम्ही ते बऱ्याचदा समजून घेतो. पण कोणीतरी टाइम पास म्हणून किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने असे करत आहे असे लक्षात आल्यास अलीकडे आम्ही काही उत्तरं देण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे. लैंगिकतेविषयी सकारात्मक संवाद व्हावा हा वेबसाईटचा उद्देश आहे. पण काहीजण तो लक्षात घेत नाहीत.

तुमच्या कौतुकाबद्दल खूप खूप आभार वेबसाईट इतर लेख किंवा व्हिडीओ, पॉडकास्ट याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

नुकताच आम्ही ‘सेक्स आणि बरंच काही’ हा पॉडकास्ट प्रकाशित केलं आहे त्याविषयी तुमचे मत नक्की कळवा.

https://letstalksexuality.com/category/podcasts/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 18 =