प्रश्नोत्तरेएकदाही दुसऱ्या पुरुषाशी संबंध आला तर काय होईल ?

1 उत्तर

लैंगिक संबंध हा संमतीने आणि सुरक्षितपणे म्हणजेच कंडोम वापरून केला असेल तर काळजीचे कारण नाही. संबंध किती वेळा आला यापेक्षा तो मासिकपाळीचक्राच्या कोणत्या कालावधीत आला? किंवा योग्य ते गर्भनिरोधक वापरले होते का? लिंग सांसर्गिक आजार असणाऱ्या व्यक्तीबरोबर आला का? याचा विचार करणे गरजेचे आहे. लैंगिक संबंध आला म्हणजे एच.आय.व्ही. किंवा इतर लिंगसांसर्गिक आजार होतील अशी भिती किंवा महिला असेल तर गरोदर राहील का? असेही वाटू शकते. गर्भनिरोधक वापरले नसेल आणि गर्भधारणेची शक्यता वाटत असेल तर गरोदरपणाची चाचणी करा. लिंगसांसर्गिक आजारांची काही शक्यता आणि त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. असा काही त्रास नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे दुसऱ्या पुरुषाशी लैंगिक संबंध करणे हे पाप किंवा अनैतिक आहे. ही अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. लैंगिक संबंध येण्यासाठी गरज आहे – दोन्ही व्यक्ती सज्ञान (१८ वर्षापुढील), दोघांची संमती, विश्वास, आणि सुरक्षितपणाची म्हणजे योग्य ते गर्भनिरोधक वापरण्याची. कंडोम हे उत्तम गर्भनिरोधक आहे ज्यामुळे गर्भधारणा तसेच लिंग सांसर्गिक आजार या दोन्हीपासून सुरक्षितता मिळू शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 17 =