प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएका महिन्यात दोन वेळेस पाळी का येते

1 उत्तर

मासिक पाळीचे चक्र साधारणपणे २८ ते ३० दिवसांचे असते. २२ ते ३४ दिवसांचं पाळीचक्र नॉर्मल मानलं जातं. स्त्रीला गंभीर अॅनिमिया असेल, औषधोपचार सुरु असतील किंवा प्रंचड तणावाखाली ती वावरत असेल तर या चक्रात फरक पडू शकतो. नियमित असणाऱ्या पाळीत खंड किंवा अंतर पडू शकतं. मात्र, मासिक पाळी २१ दिवसाच्या आत किंवा ३५ दिवसानंतर येत असेल तर एखाद्या आजाराची लागण किंवा संसर्ग झाला आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. यासाठी आपण स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आजाराचे योग्य निदान करण्यासाठी अवश्य असणाऱ्या टेस्ट करणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्ही विचारलेल्या प्रश्नात आपल्या वयाचा उल्लेख नाही. पण आपण ३० वर्षे किंवा त्यापुढील असाल तर ‘प्याप सिम्यर टेस्ट’ आवश्यक असते. ही अगदी साधी आणि सोपी टेस्ट आहे. ज्यामुळे गंभीर आजार असेल तर निदान होण्यासाठी नक्कीच मदत होवू शकते. कोणत्याही आजाराच्या निदानासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागणार हे नक्की.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 14 =