अशा वेळी किमान दोन आठवडे लैंगिक संबंध ठेऊ नका. न चुकता दोन तीन आठवड्यांनी तपासणी करून घ्या.
साधारणतः चार ते सहा आठवड्यात तुम्हांला पाळी सुरू होईल. पण सहा आठवड्यानंतरही पाळी आली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. भरपूर पाणी प्या, पालेभाज्या आणि लिंबूवर्गीय फळं, ताक असे पदार्थ खा.
पोटातील वेदना आणि रक्तस्राव कमी करण्यासाठी पोटाच्या खालच्या भागात हळूवारपणे आणि वारंवार मसाज करा.
दुखत असल्यास पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवा. अति रक्तस्राव, जास्त ताप, पोटात वेदना, बेशुद्धपणाचा झटका, चक्कर येणे, योनीमार्गातून वाईट वासाचा स्राव अशी लक्षणं गंभीर आहेत. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.