प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएक स्री किती पुरुषांन सोबत संबंध ठेवू शकते

एक स्री किती  पुरुषांन सोबत संबंध ठेवू शकते

1 उत्तर

एखादी व्यक्ती मग ती स्त्री असो अथवा पुरुष किती जणांसोबत संबंध ठेऊ शकते याचे नेमके उत्तर नाही. एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत संबंध आल्याने जोडीदाराची भावनिक गुंतवणूक, नात्यातील ताण, जोडीदाराची फसवणूक, लैंगिक संबंधांमुळे पसरणारे आजार यांसारख्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. या सर्व गोष्टींची जाणीव असताना एखाद्या व्यक्तीने कितीवेळा आणि कोणाबरोबर लैंगिक संबंध ठेवावा  हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
संभोग करण्यापूर्वी दोन्ही जोडीदारांची तयारी आहे का?  दोघेही सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) आहेत का? दोघांनाही संभोग करण्याची इच्छा आहे का? संमती आहे का आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे का या बाबींचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. तसेच हे करत असताना कोणाचीही फसवणूक तर करत नाही ना? याचाही विचार करणे खूप महत्वाचे आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षित म्हणजेच योग्य ते गर्भनिरोधक वापरून संबंध  ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून नको असलेली गर्भधारणा तसेच लैंगिक संबंधांमुळे पसरणारे आजार रोखण्यास मदत होऊ शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 20 =