प्रश्नोत्तरेएच आय व्ही असलेल्या मुली सोबत लग्न केल तर येणार्या आडचणी
1 उत्तर

एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस. एचआयव्हीचं रुपांतर काही काळाने एड्समध्ये होतं. एचआयव्ही बरा होऊ शकत नाही. मात्र आता औषधं आणि योग्य आहाराच्या मदतीने एचआयव्ही असला तरी चांगलं आयुष्य जगता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्ही जरी त्या मुलीसोबत लग्न केलत, तरी त्यात वाईट अस काहीही नाही. फक्त तुम्ही एच आय व्ही निगेटिव असाल तर हा आजार तुम्हाला होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.
एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.
एचआयव्ही होऊ नये म्हणून
लैंगिक संबंधातून लागण टाळण्यासाठी

  • निरोधचा वापर
  • एकाहून अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळा. किंवा असे संबंध नेहमी निरोधचा वापर करूनच ठेवा.

आपल्या समाजात एड्स या आजाराची भीती आणि त्याला कलंक समजण्याची मानसिकता अजून गेलेली नाही. एच आय व्ही पॉझिटिव व्यक्तींचा स्वीकार समाजात सहजासहजी होत नाही. ह्या पार्श्वभूमीवर अशा लग्नात कौटुंबिक अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घेणे, समजवून सांगणे, या नात्यासाठी त्यांना तयार करणे ई. गोष्टी कराव्या लागतील. वरील खबरदारी घेतल्यास दोघानाही लग्नानंतर चागलं आयुष्य जगता येईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 12 =