प्रश्नोत्तरेएमसी आल्यावर सेक्स करावा का नाही

2 उत्तर

मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ देऊ नयेत. या गैर समाजाचा संबंध पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते, तिला स्पर्श वर्ज असतो, पाळीतील रक्त अपवित्र असतं म्हणून तिला ‘बाजूला’ बसवलं गेलं पाहिजे इ. अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्या सांभाळत आलो आहोत त्यांच्याशी आहे. या पितृप्रधान परंपरा आणि गैरसमजुतीनाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे.

पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की, काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. पाळी दरम्यान रक्तस्त्राव होत असतो. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर संभोग करू नये. काहींना मासिक पाळीच्या वेळी योनीतून रक्त जात असताना त्यात लिंग घालून संभोग करायला घाण वाटतं, असं वाटत असेल तर या काळात संभोग करू नये. या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे.

पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एड्स किंवा इतर लैंगिक आजार असेल तर स्त्रीला लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींनी एकमेकांची संमती, इच्छा, एकमेकांप्रती किमान आदर आणि सर्वांचा आनंद या गोष्टींना महत्व देणं फार गरजेचं आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 6 =