प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकधी कधी मुलांवरहि आकर्शण होत हा काय प्रकार आहे

1 उत्तर

हो असं होतं आणि त्यात काहीही वाईट किंवा चुकीचे नाही. एखाद्या मुलाला अनेकदा मुलाबद्दल किंवा मुलीला मुलीबद्दल आकर्षण वाटू शकते. वास्तवात प्रत्येक व्यक्तीचा आपला लैंगिक कल ठरायला वेळ लागू शकतो. ती काही एका रात्रीत होणारी किंवा संपणारी फिक्स अशी गोष्ट नाही. मुलगा किंवा मुलगी वयात येताना भिन्नलिंगी व्यक्ती सोबतच समलिंगी व्यक्ती साठी आणि कधी कधी दोघांबाबतही आकर्षण निर्माण होऊ शकते. एकदा तयार झालेला लैंगिक कल वयाच्या पुढच्या टप्प्यावर बदलूही शकतो. आपल्या वेबसाईट वरील सगळे नॉर्मल आहे या सेक्शन ची लिंक देत आहे. त्यातील लेख वाचा. अधिक माहिती मिळेल.

https://letstalksexuality.com/its-perfectly-normal/

https://letstalksexuality.com/sexual-orientation-and-diversity/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 9 =