प्रश्नोत्तरेकाही बायका खुपच सुंदर असतात की तिला पाहील्यावर लिंग कडक होते तिथे तिला मिठी मारावी

1 उत्तर

एखाद्या व्यक्तीविषयी लैंगिक भावना किंवा आकर्षण निर्माण होणे ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. या भावनांमुळे लिंगाला ताठरता येते आणि ते कडक होते. वीर्यपतन झाल्यानंतर ते पुन्हा पूर्वीच्या अवस्थेत येते. यामध्ये वाईट असे काही नाही. इतर भावनांसारख्याच लैंगिक भावनाही नैसर्गिक आहेत.

मात्र मनात निर्माण होणाऱ्या सगळ्याच भावना प्रत्यक्षात कृतीत उतरतील असे नेहमी होणे शक्य नाही. कोणतीही कृती करताना समोरच्या व्यक्तीची इच्छा आणि संमती आवश्यक असते. जोडीदाराविषयी आदर असणं देखील महत्वाचं आहे. आकर्षण, मिठी मारावी असं वाटणं किंवा इतर लैंगिक इच्छा होणं नैसर्गिक असलं तरी देखील त्यासाठी समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती तितकीच महत्वाची असते. शिवाय मुलींकडे फक्त लैंगिक दृष्टीनेच बघणं हे मात्र चांगले नाही.

प्रत्यक्षात लैंगिक कृती शक्य नसतील अशावेळी काहीजण हस्तमैथुन करतात आणि त्यात गैर काहीही नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 1 =